लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ‘रस्ता’सुरक्षा अभियानातंर्गत मंगळवारी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी बुलडाणा येथे पथनाट्यातून रस्ता सुरक्षेचे धडे दिले. यावेळी विविध जनजागृतीपर उपक्रमही राबविण्यात आले.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबोडा येथील सविता लीलाधर तायडे यांच्या मार्गदर्शनात इयत्ता ३ रीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. यावेळी शिक्षिका भावना गौर, शिक्षक धनराज सातपुतळे आदींचे सहकार्य लाभले. रस्ता सुरक्षेचे महत्व, रहदारीचे नियम, रस्त्यांवरील सांकेतिक चिन्हांची ओळख करून देण्यासाठी तसेच विद्यार्थीदशेपासूनच विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे मिळावे, यासाठी शिक्षिका सविता तायडे यांनी रस्ता सुरक्षेचे पथनाट्य दिग्दर्शीत केले. या पथनाट्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.