शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जमीन अधिग्रहणाशिवाय रस्त्याचे काम करू नये - राहुल बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:06 IST

खामगाव ते चिखली व चिखली ते मेहकर या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गामध्ये  समावेश करून सदर दोन्ही रस्ते २४ मीटर रुंदीचे तयार करण्यात येत आहेत.; परंतु  यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतजमिनीचे कुठलेही  अधिग्रहण न करता परस्पर शेती ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे कामकाज सुरू करण्यात  आले आहे, ही बाब अन्यायकारक असल्याने या विरोधात रस्त्याच्या कडेला असलेल्या  शेतकर्‍यांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांना  निवेदन देऊन शेतजमिनीचे कायदेशीर अधिग्रहणानंतर रस्त्याचे काम सुरू करावे, अशी  मागणी केली आहे.  

ठळक मुद्देबोंद्रे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचे पालकमंत्र्यांना निवेदनखामगाव-चिखली व चिखली-मेहकर मार्गाचे रुंदीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : खामगाव ते चिखली व चिखली ते मेहकर या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गामध्ये  समावेश करून सदर दोन्ही रस्ते २४ मीटर रुंदीचे तयार करण्यात येत आहेत.; परंतु  यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतजमिनीचे कुठलेही  अधिग्रहण न करता परस्पर शेती ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे कामकाज सुरू करण्यात  आले आहे, ही बाब अन्यायकारक असल्याने या विरोधात रस्त्याच्या कडेला असलेल्या  शेतकर्‍यांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांना  निवेदन देऊन शेतजमिनीचे कायदेशीर अधिग्रहणानंतर रस्त्याचे काम सुरू करावे, अशी  मागणी केली आहे.  खामगाव ते चिखली व चिखली ते मेहकर या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून  रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे.  वस्तुत: सदर डांबरी रस्ता पूर्वी फक्त २0 फूट  रूंदीचा असताना आणि तेवढीच जमीन शेतकर्‍यांनी शासनास दिलेली असताना, सद्यस् िथतीत कुठलेही कायदेशीर अधिग्रहण न करता हा रस्ता रूंद केल्या जातो आहे. शिवाय या रस्त्याची बाहेरील प्रकल्पात येणारी जमीन शासन ताब्यात घेणार असल्याची  माहितीही मिळाल्याने शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे.  सदर चुकीच्या व  बेकायदेशीर अधिग्रहणामुळे शेतकर्‍यांच्या जमिनी फुकट हिरावल्या जात असल्याने हा  अन्याय होऊ नये त्यासाठी शासनाने कायदेशीर जमीन अधिग्रहीत करून शेतकर्‍यांना  त्याचा योग्य मोबदला द्यावा व नंतरच काम सुरू करावे, अन्यथा न्यायालयात कायदेशीर  मार्गाने लढाई लढावी लागेल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.  दरम्यान,  आमदार राहुल बोंद्रे यांनी शेतकर्‍यांची व्यथा शासनदरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून  देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले. पालकमंत्री ना.फुंडकर यांच्याशी चर्चा  करताना सदर प्रश्नी मंत्रालयात बैठक बोलाविण्याचा आग्रह धरण्याबरोबरच बैठकीत  संबंधित मंत्री महोदयांशी सविस्तर चर्चा करून शेतकर्‍यांचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा,  असा आग्रह आ.बोंद्रे यांनी धरला असता, पालकमंत्र्यांनी यावर सकारात्मक भूमिका घेत  लवकरच मंत्रालयात बैठक लावण्याचे मान्य केले आहे. यावेळी  खंडाळा मकरध्वज,  मुंगसरी, भालगाव, खैरव, आमखेड, कोलारा, आंबाशी, वैरागड, उंद्री, अमडापूर,  टाकरखेड मुसलमान, कव्हळा, करणखेड, दहीगाव, उत्रादा, पेठ, बोरगाव वसु,  दिवठाणा, सोमठाणा, शिंदी हराळी, शेलुद आदी गावातील शेतकरी उपस्थित होते.  

टॅग्स :Rahul Bondreराहुल बोंद्रेBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरchikhali roadचिखली रोड