---
नवीन अंगणवाडी सुरू करण्याची मागणी
बुलडाणा : सुंदरखेड भागात नवीन अंगणवाडी सुरू करावी, अशी मागणी वॉर्ड क्रमांक १० मधील युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या भागात केवळ दोन अंगणवाडी आहेत. परंतु इतर लगतच्या प्रभागात अंदाजे ८० ते १०० बालक, बालिका अंगणवाडी लाभापासून वंचित आहेत.
----
खिळेमुक्त झाडे अभियान राबवणार
बुलडाणा : जाहिरात फलकांनी संपूर्ण शहर व्यापून टाकले असतानाच आता रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांचाही उपयोग फलक लावण्यासाठी केला जात आहे. यामुळे वृक्षांना इजा पोहोचत असून, शहरात पर्यावरण प्रेमींच्या वतीने खिळेमुक्त झाडे अभियान राबवण्यात येणार आहे.
सुरक्षित अंतर ठेवून वस्तुंची विक्री करा
मोताळा : किराणा दुकानदारांनी सुरक्षित अंतराची व्यवस्था करून वस्तूची विक्री करावी असे आवाहन करण्यात येत आहे. ग्राहकांसाठी हॅण्डवॉशची सुविधा उपलब्ध करून द्यावी, याबाबत जनजागृती मोताळा नगर पंचायतच्यावतीने करण्यात आले.
दुसरबीड परिसरात विजेचा लपंडाव!
दुसरबीड: परिसरात काही गावांमध्ये विजेचा लंपडाव सुरू आहे. यामुळे नागारिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गत दोन दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरू आहे. रात्रीही या भागातील वीज गेली होती. सध्या उकाडा होत असून डासांचेही प्रमाण वाढले आहे.
----
निजंर्तुकीकरण फवारणी करावी!
बुलडाणा: शहरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहरात नगर पालिका प्रशासनाच्यावतीने शहरात निजंर्तुकीकरण द्रावण फवारण्याची मागणी होत आहे. तर नाल्यांवर ब्लिचिंग पावडर शिंपडण्यात यावे.
मूर्ती ग्रामपंचायतीचा स्वच्छतेवर भर!
मोताळा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारी ग्रामपंचायत प्रशासनाकडून स्वच्छतेस प्राधान्य देण्यात आले. गावातील मोकळ्या जागांसह नाल्या आणि विविध परिसरात दुसऱ्यांदा निजंर्तुकीकरण द्रावणाची फवारणी करण्यात आली.
उन्हाच्या दाहकतेने नागरिक हैराण
बुलडाणा : शहरातील तापमानात गत महिनाभरापासून सातत्याने वाढ होत आहे. गत पंधरवड्यात शहराचे तापमान ४० अंशावर पोहोचले होते. गत आठवड्यापासून आता आणखी तीन अंशाने म्हणजेच ४१ अंशावर शहराचे तापमान पोहोचले आहे.
-
शेतकत्यांच्या समस्या सोडवा!
सिंदखेड राजा : शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांबाबत तातडीने निर्णय घेऊन पेरणीपूर्वी समस्या सोडवाव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. खत कारखान्यांना दिली जाणारी सबसिडी सरळ शेतकऱ्यांनाच द्यावी अशी मागणी केली आहे.
पाण्याच्या शोधात प्राण्यांची गावाकडे धाव
मोताळा : परिसरात अस्वलाचा मुक्त संचार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहाटेच्या वेळी तेरा मैल परिसरात अनेकदा अस्वल दिसतो. शेतकरी शेतात जात असताना त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. सध्या पाण्याच्या शोधात प्राणी गावाकडे धाव घेत आहेत.
वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्ष!
मोताळा: सामाजिक वनिकरण विभागाच्या वतीने रस्ते दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली आहे. मात्र या वृक्षरोपट्याच्या संवर्धनाकडे लक्ष पुरविण्याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
धाड परिसरात विद्यूत रोहित्र नादुरूस्त
धाड: परिसरात विद्यूत रोहित्र नादुरूस्त असल्याचे दिसून येत आहे.याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी विद्यूत रोहित्र खुले असून यामुळे जीविताला धोका निर्माण झाला आहे. याकडे महावितरणने लक्ष द्यावे.
----------
उन्हाळी सोयाबीनवर यलो मोझॅकने शेतकरी त्रस्त
डोणगाव: परिसरात यावर्षी जलसाठा भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने, उन्हाळी भुईमूग, मूग व कृषी विभागाच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी थोड्या फार प्रमाणात उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली आहे. आता उन्हाळी सोयाबीनचे पीक ऐन फुल, कळी व शेंग धारणेवर बसताना या पिकावर यलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता वाढली आहे.
-----------