या होणाऱ्या कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी काही शेतकऱ्यांनी फोनवरून चर्चा करुन निकृष्ट काम होत असल्याची तक्रार केली होती. या ठेकेदाराचे संबंधित कामाचे बिल देऊ नये, अशी मागणी केली. अमडापूर ते मेडशिंगा रोडचे काम हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून होत असून हे काम २ कोटी ८४ लाख रुपयांचे आहे. हे काम ठेकेदाराकडून करून घेण्यात येत आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सर्व शेतकरी व गावकरी यांनी हे काम बंद पाडले. याबाबत बुलडाणा उपविभागीय अधिकारी अनिल पाटील यांनाही माहिती देण्यात आली. ४ मार्च रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी या कामाच्या ठिकाणी येऊन कामाची पाहणी केली. ज्या ठिकाणी निकृष्ट काम झाले त्याठिकाणी पुन्हा चांगले काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
रस्ता कामाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:32 AM