दिल्ली येथील ७० दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे येणाऱ्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय किसान समन्वय समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय किसान मोर्चा, आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलनाची भूमिका ठरवू तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनासुद्धा आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी दिला. केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन प्रमुख शेतकरी नेत्यांची आंदोलनकर्त्यांशी चर्चा करायला हवी होती. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे होते, तसे होताना कुठेही दिसत नाही, असे मत यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. आंदोलनादरम्यान पोलिस बंदोबस्त होता. आंदोलन करत असताना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आंदोलन करताना ताब्यात घेऊन अटक केली होती. यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष प्रफुल्ल देशमुख, पक्षाचे तालुका अध्यक्ष नितीन अग्रवाल, लोणार तालुका अध्यक्ष सहदेव लाड, तालुका उपाध्यक्ष अनिल पवार, अशपाक शहा, अफरोज शहा, सदाशिव वडुळकर, अजम कुरेशी, अजगर कुरेशी, राष्ट्रीय किसान मोर्चाचे ॲड. विष्णू सरदार, अरुण गवळी, गजानन धंदोरे, गजानन पवार, भास्कर कंकाळ, आम आदमी पार्टीचे भानुदास पवार, वसुदेव लंबे, संजय लष्कर, मच्छिंद्र सेलकर, रवी निकाळजे व शेतकरी उपस्थित होते.
मेहकर येथे रास्ता रोको, आंदोलनकर्त्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:32 AM