अंढेरा (बुलडाणा): येथील गणेश भानुदास सानप (१९) या युवकाची हत्या होवून तीन दिवस लोटले. मात्र पोलिसांनी अद्यापही आरोपींना अटक केली नाही, असा आरोप करुन संतप्त झालेल्या मृ त गणेशच्या नातेवाईकांनी अंढेरा पोलिस स्टेशनवर दगडफेक केली. यात सात पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना आज ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३0 वाजेच्या सुमारास घडली.गणेश सानपचा मृतदेह ४ ऑक्टोबर रोजी दुपारी परिसरातील एका शेतात आढळून आला होता. मात्र त्या युवकाची आत्महत्या नसून हत्या झाल्याची पोलिस तपासात उघड झाले. त्यामुळे मृत युवकाचा भाऊ रामेश्वर सानप याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार लोकांवर ३0२ अधिक ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. तरी पोलिस तपासात दिरंगाई होत आहे, तसेच गुन्हा दाखल करुनही पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक केली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला. यामुळे आज मृत गणेशच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अंढेरा पोलिस स्टेशनवर दगडफेक केली. यात स्टेशनच्या इमारतीचे काही प्रमाणात नुकसान झाले. शिवाय तेथे कार्यरत पोलिस कर्मचारी अरूण मुंढे यांच्यासह महिला कर्मचारी ज्योत्सना खरात, स्वाती वाणी, पोर्णिमा साळवे, दिपाली सा तव, शुभांगी धन्नावत, प्रियंका पर्हाड हे किरकोळ जखमी झाले. सर्व कर्मचार्यांना उपचारासाठी दे.मही येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंढेरा पोलिस स्टेशनवर दगडफेक
By admin | Published: October 06, 2014 11:46 PM