- अशोक इंगळे लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी येथील युवकाने चित्राच्या माध्यमताून जागृती करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या युवकाने कोणतीही आर्थीक मदतीची अपेक्षा न ठेवता गावातील रस्ते, भिंती बोलक्या केल्या आहेत. या माध्यमातून ‘घरीच राहा, सुरक्षीत राहा’चा संदेश देण्यात येत आहे.साखरखेर्डा येथील शे. समीर शेख. कदीर या सुशिक्षित युवकाला चित्रकलेचा छंद आहे. आपला छंद जोपासत असताना आपण समाजा करीता, गावा करीता काय करु शकतो! ही रुखरुख त्याच्या मनाला भुरळ घालीत होती. कोणत्याही आर्थीक मदतीची अपेक्षा न बाळगता हातात रंगाचा डबा आणि ब्रश घेवून श्री पलसिध्द मठापासून: कोरोना विषाणुचे संकल्पीत चित्र काढून ‘ मीच माझा रक्षक’ माझे आरोग्य माझी जबाबदारी, घरीच राहा सुरक्षीत राहा , मास्क, रुमाल तोंडाला लावा, असे स्लोगन काढीत पलसिध्द चौक , प्राथमिक आरोग्य केंद्र, टी. पॉर्इंट, एस. ई. एस. हायस्कूल, बस स्थानक, महाराणा प्रताप चौक, ग्राम पंचायत, प्रत्येक मंदीर, मज्जीत, समोरील रस्ते बोलू लागली आहे. .आज डिजीटल बोर्डाचा वापर होत असल्याने पेंटींग व्यवसायाला अवकळा आली. हातात कला, गुण असतांना ती कला काम मिळत नसल्याने लोप पावत चालली. कोरोना व्हायरसमुळे डिजीटल कारखाने बंद पडले. गावात जनजागृती साठी एकही फलक लावण्यात आला नाही. आज प्रत्येक व्यक्तीची नजर रस्त्याने जाता येता त्या सुचेना फलकावर जाते. आणि एक मिनीटे उभं राहून प्रत्यकजण सुचनांचे वाचन करतो. अशातच चित्रातून जनजागृती, समाजाला दिला धिर, रस्त्यांना सुचना फलक करणारा समिर असल्याची मत अजीम नवाज राही यांनी व्यक्त केले.