लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : जबरी चोरी व दरोडा टाकणारा आरोपी अजय मन्साराम चव्हाण यास अकोट तालुक्यातून अटक करण्यात जळगाव जामोद पोलिसांना अखेर यश मिळाले. गत एक वर्षापासून पोलीस त्याच्या शोधात होते. आरोपीच्या विरोधात जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोराळा रस्त्यावर एक वर्षापूर्वी रात्री ८ वाजता आदिनाथ पुंडलीक वाघ यांची मोटारसायकल अडवून त्यांच्याकडील २० हजार ३७० रुपये व एक मोबाइल हिसकावून संबंधित आरोपी पळून गेला. गुन्ह्यात आरोपीला शोधून काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते; परंतु आरोपीने नेलेल्या मोबाइलच्या लोकेशनवरून जळगाव पोलिसांनी अकोट तालुक्यातील उमरा येथून मुख्य आरोपी अजय मन्साराम चव्हाण (वय २६) यास अटक केली.आरोपीवर दर्यापूर, खल्लार, सोयगाव, मलकापूर ग्रामीण या पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. ताे मलकापूर ग्रामीण व सोयगाव येथील गुन्ह्यामध्ये फरार आहे. बऱ्याच दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते; परंतु तो मिळत नव्हता. अखेर जळगाव जामोद पोलिसांनी त्याला जेरबंद केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी एक पथक नेमून त्यांना निर्देश दिले होते. पथकात सहायक पाेलीस निरीक्षक सतीश आडे, पोलीस उप-निरीक्षक भारत बर्डे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश पाटील, विकास गव्हाड व सुनील वावगे यांचा समावेश होता. त्याच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अट्टल दरोडेखोर जळगाव पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 12:37 IST
Buldhana Crime News आरोपी अजय मन्साराम चव्हाण यास अकोट तालुक्यातून अटक करण्यात जळगाव जामोद पोलिसांना अखेर यश मिळाले.
अट्टल दरोडेखोर जळगाव पोलिसांच्या ताब्यात
ठळक मुद्देजबरी चोरी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याच्या मागावर होते; परंतु तो मिळत नव्हता.