शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

रोहयोमध्ये जगण्याचे बळ!

By admin | Published: February 29, 2016 2:25 AM

बुलडाणा जिल्हा नियोजन समिती सभागृहात आढावा बैठक.

बुलडाणा : समाजातील दीन- दुबळ्या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ही अशा घटकांना मजुरीच्या माध्यमातून समाजात ताठ मानेने जगण्याचे बळ देते. या योजनेत जनसामान्यांमध्ये जगण्याची ताकद निर्माण करण्याची क्षमता असून, योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिल्या. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात २८ फेब्रुवारी रोजगार हमी योजनेची ची जिल्हा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समिती सदस्य आमदार शोभा फडणवीस, सुभाष देशमुख, संजय रायमुलकर, बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ, सहसचिव म. मु काज, रोहयोचे उपसचिव प्रमोद शिंदे, कक्ष अधिकारी शशिकांत गायकवाड आदी उपस्थित होते. राज्याचे नवनिर्माण करण्यासाठी रोहयोमध्ये आमूलाग्र बादल करण्यात येणार असल्याचे संकेत देत रावल म्हणाले की, या योजनेत लवचिकता आणून मोठय़ा प्रमाणावर मजुरांना तातडीने कामे उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. लवकरच महाराष्ट्र जनकल्याण स्वाभिमान योजना आणण्यात येणार आहे. ही योजना अत्यंत प्रभावीपणे राज्यातील बेरोजगार हातांना काम देऊन निर्माण कार्य करेल. ते म्हणाले की, भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने विहीर पुनर्भरणाची कामे रोहयोच्या माध्यमातून घेण्यात यावी. गोठा, तलावातील गाळ काढणे, फळबाग लागवड, शौचालय निर्मिती, शेत रस्ते, गावातील अंतर्गत रस्ते आदी कामे रोहयोतून घेता येतात. ती घ्यावी आणि रोजगार उपलब्ध करून द्यावा. मजुरांचे पगार देताना पगार हजेरीपत्रक दोन वेळा जर चुकल्यास संबंधित कर्मचार्‍याला निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. मेहकर तहसीलदार यांनी स्व:खर्चातून गाळ काढण्याचे सुरू केलेले काम प्रशंसनीय असल्याचे ते म्हणाले. समितीला जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी माहिती दिली. बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, रोहयो उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक एस. आर. मोरे, कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे, जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रवीण कथने आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.