खामगाव: फरशी भागातील एका शिकस्त इमारतीचे छत व काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत कुठलीही हानी झाली नाही. मागील काही दिवसांमध्ये शहरात शिकस्त इमारती कोसळल्याच्या दोन घटना घडल्या. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील एका इमारतीचा अर्धा भाग कोसळला होता. नेहमीच वर्दळीचा भाग असलेल्या फरशीवरील अग्रवाल यांच्या इमारतीचा समोरचा काही भाग अचानक कोसळला. या इमारतीच्या ओट्यावर अनेक नागरिक बसलेले असतात. परंतु रात्री पाऊस सुरु असल्याने याठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते. शहरातील शिकस्त इमारतीबाबत नगर परिषद प्रशासन आणि नागरिकांनी जागरूक राहून दक्षता बाळगण्याची गरज आहे.
शिकस्त इमारतीचे छत कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:59 AM