शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

सौरऊर्जेवर उजळतात भटक्यांच्या राहुट्या

By admin | Published: August 25, 2015 2:06 AM

बुलडाणा मलकापूर मार्गावर भटकंती करणा-या लोकांनी घेतला सौर ऊज्रेचा आधार.

नीलेश शहाकार / बुलडाणा : विजेच्या वाढत्या तुटवड्यामुळे अपारंपरिक असलेल्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होण्यासाठी शासन प्रचार व प्रसार करीत आहे; मात्र चांगल्या सुखवस्तु घरातही सौर ऊर्जेचा वापर होताना दिसत नाही. या पृष्ठभूमीवर भटकंती करून शहरात काही भटक्यांनी आपल्या कृतीतून सर्वांंंसमोर आदर्श ठेवला आहे. हातावर पोट असलेल्या या भटक्यांच्या राहुट्या सध्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून चकाकल्या आहेत.पोटाची खळगी भरण्यासाठी दर कोस दर मुक्काम करत बुलडाणा शहरात काही कुटुंबे रोजगारासाठी दाखल झाली आहेत. त्यांना अवगत असणारे ज्ञान आणि जडीबुटी व वनौषधाच्या विक्रीचा पारंपरिक व्यवसाय त्यांनी शहरातील विविध रस्त्यावर थाटला आहे. मलकापूर मार्गावर मागील आठ-दहा दिवसांपासून याच पाच कुटुंब पाल वजा राहुट्या तयार करुन आपल्या कुटुंबासह राहत आहेत. रोजगार मिळेल व पोटाचा प्रश्न सुटेल, या हेतूनेच ही कुटुंबे राहत असली तरी त्यांनी आपल्या झोपड्यांमध्ये अपारंपरिक असलेल्या सौर ऊर्जेचा वापर करीत राहूट्यानजिक चार सौर पॅनल बसविले आहे. यातून मिळणार्‍या सौर ऊर्जेद्वारे या गरीब भटक्यांच्या एका झोपडीत विजेचे दोन बल्ब प्रकाशित होतात. तर दिवसभर टीव्ही व पंखा चालत आहे. विजेची बचत करण्यासाठी सौरऊर्जा स्वयंपूर्ण गाव संकल्पना, सौर कृषीपंप आणि शासकीय इमारतीवर सौरपॅनल बसविण्याच्या उपाययोजना शासकीय स्तरावर सुरु आहेत. सदैव फिरस्तीवर राहणार्‍या गरिबांनी कुठलेही शासकीय अनुदान न घेता सौर ऊज्रेची धरलेली कास इतरांना लाजिरवाणी करणारी बाब आहे. *बचतीतून घेतले सौरपॅनलनेहमी भटकंती करावी लागत असल्यामुळे या लोकांच्या झोपड्यांना वीजपुरवठा मिळत नाही.त्यामुळे यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून आपल्या मिळकतीतून पै-पै जमवून या लोकांनी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे चार सौरपॅनल घेतले आहे. सौर ऊर्जा पॅनलवर १२ व्होल्टच्या दोन बॅटर्‍या चार्ज केल्या जातात. या आधारे झोपडीतील लाईट, पंखा, टीव्ही चालविले जाते.