लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: विजेची चोरी आणि अनधिकृत वापर करणार्यांविरोधात महावितरणने १८ ते २0 जानेवारीदरम्यान धडक मोहीम उघडून ५९ पथकांच्या सहकार्याने बुलडाणा जिल्हय़ात ३८ लाख ३२ हजार रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली आहे. जिल्हय़ात ५0६ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असून, त्यात ४ लाख ४ हजार युनिट वीज चोरीद्वारे वापरली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधितांविरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत.बुलडाणा, चिखली, धाड, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, लोणार, मोताळा, जळगाव जामोद, खामगाव, शेगाव, मेहकर, मलकापूर व नांदुरा या उपविभागमध्ये सध्या दर्जेदार वीज सेवा देण्यासाठी कामे सुरू आहेत. सोबतच वीजहानी, गळती व वीज चोरी कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. वीज चोरीला अटकाव घालण्यासाठी प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत व मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक अभियंता गुलाबराव कडाळे यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंते काकाजी रामटेके, बद्रीनाथ जायभाये, पांडुरंग पवार यांच्यासह अभियंते, अधिकारी व जनमित्र मिळून ५९ पथके या धडक मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी झाले होते. वीज मीटर मध्ये हस्तक्षेप करून थेट वीज चोरी केली जात असल्याचेही समोर आले. यामध्ये २८७ ग्राहकांनी वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून तीन लाख ९ हजार युनिटची म्हणजे जवळपास २९ लाख ३४ हजार रुपयांची चोरी केली. १८३ जण तर थेट वीज तारेवरच हूक टाकून थेट चोरी करताना आढळून आले. त्यांनी ८ लाख ९८ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले. असे जवळपास ४७0 जणांनी ४ लाख चार हजार युनिटची ३८ लाख ३२ हजार रुपयांची चोरी केली आहे. त्यांच्या विरोधात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुसर्या कारणासाठी वीजेचा वापर करणार्या ३६ ग्राहकांविरोधात कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली.
वीज चोरी व गैरप्रकाराबाबत गंभीरमहावितरण जिल्हय़ात होत असलेल्या वीज चोरी आणि गैरप्रकाराबाबत गंभीर आहे. शहरी भागात जादा प्रमाणात होणारी वीज चोरी पाहता अशी ठिकाणे निश्चित करून गोपनीय पद्धतीने आकस्मिक स्वरूपात कारवाई केली जाईल. वीज चोरीसाठी मीटरमध्ये तांत्रिक सुधार करून देणारे सूत्रधारही महावितरणच्या रडारवर असल्याचे बुलडाणा मंडळाचे अधीक्षक अभियंता गुलाबराव कडाळे यांनी स्पष्ट केले.