शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

कारच्या चाॅईस नंबरसाठी मोजले ५० हजार रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 11:52 AM

RTO News : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने १०३ वाहनांना चॉईसनंबर देण्यात आले.

- योगेश देऊळकारलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गत १ ते २४ जून या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने १०३ वाहनांना चॉईसनंबर देण्यात आले. या माध्यमातून १० लाख ४४ हजारांचा महसूल जमा झाला आहे. कारसाठी सर्वाधिक ५० हजार तर दुचाकीसाठी १५ हजारापर्यंतचा खर्च वाहनधारकांनी केला आहे. आकर्षक नंबर आणि ग्राहकांच्या मागणीनुसार दिल्या जाणाऱ्या चॉईस नंबरसाठी परिवहन विभाग ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करते. त्यासाठी आरटीओने आकर्षक नंबर कोणते, त्याची यादी निश्चित केलेली आहे. सध्याच्या पद्धतीनुसार, वाहन नोंदणीची नवीन सिरीज खुली होण्याआधी आरटीओच्या वतीने आवाहन करून नागरिकांना चॉईसनंबरसाठी बुकिंग करण्यास सांगण्यात येते. त्यानुसार नागरिक स्वत: आरटीओत जाऊन नंबर बुक करतात. त्यासाठी निश्चित रकमेचा डिमांड ड्राफ्ट किंवा नगदी रक्कम आरटीओत जमा करावी लागते. बुकिंग करून रक्कम  भरल्यानंतर सदर क्रमांकाच्या वाहनाची ३० दिवसाच्या आत नोंदणी करणे अनिवार्य आहे. दरम्यान, एका नंबरसाठी एकापेक्षा अधिक अर्ज आले असल्यास संबंधित नंबरची रक्कम डिमांड ड्राप्ट द्वारे जमा करावी लागते. त्यानंतर लिलाव करून जास्त रक्कम देणाऱ्याला नंबर दिल्या जातो. चॉईसनंबर मिळविण्यासाठी ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन  विभागाने दिली आहे.

शासनाने सर्वसामान्यांना त्यांच्या आवडीचे नंबर मिळावे, यासाठी आकर्षक चॉईसनंबरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक नंबरचे शुल्क वेगवेगळे आहे. वाहनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.-जयश्री दुतोडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलडाणा. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkhamgaonखामगाव