ज्या विद्यार्थ्यांची आरटीई २५ टक्के काेट्यामध्ये निवड झाली आहे, त्या मुलांच्या पालकांनी ११ जून २०२१ पासून, संबंधित शाळेत जाऊन तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. प्रवेशासाठी पालकांनी जन्मतारीख, जातप्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी पुरावा, आधार आदींबाबतची मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रती सोबत ठेवाव्यात. शाळेमध्ये कागदपत्र पडताळणीकरिता पालकांनी एकाच वेळी न जाता, ज्या पालकांना शाळेकडून मेसेज प्राप्त होईल त्याच पालकांनी शाळेत जावे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता शाळांनी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. पालकांना प्रवेशासाठी २० दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे. याची नोंद जिल्ह्यातील शाळा व पालकांनी घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद बुलडाणा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
१८७९ बालकांची झाली निवड
आरटीईअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील २३१ शाळांनी नाेंदणी केली हाेती, तसेच २१४२ जागांसाठी ३४४५ अर्ज आले हाेते. राज्यस्तरावर ७ एप्रिलला काढण्यात आलेल्या लाॅटरीमध्ये १८७९ बालकांची निवड करण्यात आली आहे. काेराेनामुळे ही प्रवेश प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली हाेती. आता काेराेना रुग्णांमध्ये घट झाल्याने ११ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू हाेणार आहे.