बुलडाणा: आरटीई अंतर्गत आतापर्यंत साडेतीन हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यापैकी २ हजार १९० विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी तिसºया लॉटरीनंतर पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत १८ जुलैपर्यंत होती. ही मुदत आता २४ जुलैपर्यंत वाढविण्यात आली असल्याने या मुदत वाढीचा १ हजार २९० विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी फायदा होणार आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहयाीत शाळांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरीता जिल्ह्यातील २२० शाळांमध्ये २ हजार ९०८ जागांसाठी सुरू असलेल्या आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ५ हजार ३२८ आॅनलाइन अर्ज आले. त्यासाठी लॉटरी पद्धतीने अतापर्यंत तीन फेºया पूर्ण करण्यात आल्या आहेत. तिसºया फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना वेळोवेळी मोबाईलवर जिल्हा परिषद शिक्षण विभागाडून माहिती पोहचविण्यात आली; मात्र प्रवेशाच्या १८ मे या अंतीम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील काही पालकांनी शाळा, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे संपर्क न केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्यापही बाकीच आहेत. तिसºया लॉटरीनंतर पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत १८ जुलैपर्यंत होती. परंतू या मुदतीपर्यंत निवड झालेल्यांपैकी जिल्ह्यातील १ हजार २९० विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया अपूर्णच असल्याचे दिसून आले. दरम्यान, ही मुदत २४ जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याने तिसºया लॉटरीमध्ये निवड झालेले, परंतू प्रवेश प्रक्रिया राहिलेल्या विद्यार्थ्यांना या मुदत वाढीचा फायदा होणार आहे.
आरटीई: एक हजारावर विद्यार्थ्यांना होणार मुदत वाढीचा फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 6:28 PM