बुलडाणा : शहरातील सरस्वती नगरातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुताेंडे यांच्या घरातून अज्ञात चाेरट्यांनी २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १७ ते १८ जानेवारीदरम्यान घडली. चाेरट्यांनी शेजारच्या घरातूनही २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला.
बुलडाण्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुताेंडे या सरस्वती नगरात राहतात. त्या घरी नसताना अज्ञात चाेरट्यांनी घरात प्रवेश करून राेख १२ हजार व साेन्याच्या एक तीन ग्रॅम व एक पाच ग्रॅमची अंगठी असा २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी त्या परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या विनायक पाटील यांच्याही घरात चाेरट्यांनी हात साफ करीत २३ हजार राेख, दाेन चांदीचे देव, चांदीचा दिवा, साेनाटा घड्याळ असा २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी आरटीओ जयश्री दुताेंडे यांच्या फिर्यादीवरून बुलडाणा शहर पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध भादंवि कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय अभिजित अहिरराव करीत आहेत.