लोकमत न्यूज नेटवर्करुईखेड मायंबा: बुलडाणा तालुक्यातील ग्राम रुईखेड मायंबा या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ येत्या आॅक्टोबर १७ ला संपणार असून, पुढील निवडणुकीसाठी २१ जून रोजी वार्डनिहाय आरक्षण जाहीर झाले. बुलडाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा ग्रामपंचायत परिसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून, विविध निवडणुकीत या गावाने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. दरम्यान, ग्रामपंचायत भवनात झालेल्या आरक्षण सोडतीसाठी निरीक्षक म्हणून महसूल विभागातर्फे मंडळ अधिकारी अशोक शेळके त्यांच्या सोबतीला तलाठी ताठे, ग्रामसेविका सुषमा जाधव हे होते. रुईखेड मायंबा येथे यापूर्वी तीन वार्ड आणि एकूण सदस्य संख्या ९ होती; परंतु आता एकूण वार्ड ४ झाले असून, सदस्य संख्या ११ झाली. एकूण २,४५० मतदार असून, वार्ड १ मध्ये ६५० मतदार आरक्षण सर्वसाधारण महिला १ सर्वसाधारण १ ओबीसी महिला राखीव, वार्ड २ मध्ये एकूण मतदार ६९० यामध्ये एसटी, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण वार्ड ३ मध्ये एकूण मतदार ६६० यामध्ये ओबीसी पुरुष, एससी आणि सर्वसाधारण आणि वार्ड ४ मध्ये एकूण ४५० मतदार एससी महिला आणि ओबीसी महिला असे दोन सदस्य संख्या आहे. आरक्षण प्रसंगी गावच्या सरपंच सीमा उगले, ग्रा.पं. सदस्य अनिल फेपाळे, बबन फेपाळे, पो. पाटील समाधान उगले, महात्मा गांधी तंटामफक्त समितीचे अध्यक्ष कृष्णा उगले, रमेश वाणी यांच्यासह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
रुईखेड मायंबाचे वार्डनिहाय आरक्षण जाहीर
By admin | Published: June 26, 2017 10:19 AM