लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : श्रीक्षेत्र साखरखेर्डा येथील प्रल्हाद महाराज रामदासी चरणी अकोला येथील उपासना मंडळाच्यावतीने दोन सुवर्ण रत्नजडित हार अर्पण करण्यात आले. हा सोहळा ३१ डिसेंबरला कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.श्री प्रल्हाद महाराज यांच्या १२५ व्या रथोत्सवानिमित्त यावर्षी १६ फेब्रुवारी २0१७ ते १६ फेब्रुवारी २0१८ पर्यंत संस्थानमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, आजही रामदासपंत आचार्य यांच्या उपस्थितीत कीर्तन, प्रवचन, भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दुपारी ४ वाजता कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर, संजय महाशब्दे, भाजपचे संघटनमंत्री रवींद्र भुसारी, सरपंच पूनम पाटील, विनायक धानोरकर, सुरेश गावपांडे, रामदासपंत आचार्य, डॉ.टी.व्ही. कुळकर्णी, कैलास दिंडोडिया, डॉ. विजय जोशी, उल्हास देशपांडे, माजी प्राचार्य प्रकाश लोणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम उपासना मंडळाचे सदस्य श्री प्रल्हाद महाराज भक्त माधव देशमुख, रितेश खोत, अमोल कुळकर्णी, श्रीकांत हातवळणे, सचिन जोशी, राजू गीते, संजय मुळे, जानकी गदाधरे, सचिन कुळकर्णी, सचिन जोशी यांनी रत्नजडित सुवर्णहार अर्पण केला. यावेळी श्रीराम जय राम जय जय राम या रामनामाच्या जयघोषणामुळे वातावरण भारावून गेले होते.
अध्यात्माची जोड असेल तर कार्य सिद्धीला जाते - फुंडकरजो व्यक्ती अध्यात्माच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतो, त्याचे कार्य सिद्धीला जाते. १९८३ साली प्रल्हाद महाराज यांचे प्रत्यक्ष मंदिरात दर्शन झाले, तेव्हापासून मी महाराजांचा भक्त झालो. महाराजांच्या दर्शनाने राजकीय व अध्यात्माची ऊर्जा मिळाली. भोजने महाराज यांनी संस्थानचे कार्य तुला पुढे न्यायचे आहे, असा आदेश दिला तेव्हापासून मी त्या संस्थानचा अध्यक्ष आहे. या संस्थानला गावाच्या विकासासाठी ना. नितीन गडकरी यांनी ५ कोटी २२ लाखांचा पालखी रस्ता मंजूर करून काम प्रगतिपथावर आहे, ते म्हणाले, साखरखेर्डा हे ऊर्जास्थान असून, जो-जो श्रीरामाची उपासना करणार त्याला निश्चितच ऊर्जा मिळणार त्यासाठी प्रत्येकाने उपासना करावी, असे मनोगत संघ प्रचारक रवींद्र भुसारी यांनी व्यक्त केले. यावेळी सुरेश गावपांडे, रामदासपंत आचार्य यांनी विचार मांडले. प्रकाश लोणकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अंकुर देशपांडे, प्रा. प्रकाश गवई, गाडे, डॉ. अमरीष देशपांडे, रवींद्र कुलकर्णी हजर होते.-