ठळक मुद्देसोमवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान लागली आग
लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सैलानी : सैलानीच्या जंगलामध्ये २६ फेब्रुवारी रोजी अचानक आग लागली. यावेळी शे.शफीक शे.करीम यांनी त्वरित पाण्याचे टँकर व नागरिकांना पाठवल्यामुळे आग विझवण्यात यश आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सैलानी दग्र्याला लागून वन विभागाच्या जंगलात भाविकांनी व यात्रेकरूंनी झोपड्या बांधल्या आहेत; मात्र सोमवारी सकाळी ८ वाज ताच्या दरम्यान अचानक आग लागली; मात्र वेळीच पोलीस सहायक उ पनिरीक्षक यशवंत तायडे, जहीर मुजावर, शेख सद्दाम, सादीक पठाण, शे.जुबरे, अमीन पठाण, अंबादास वाघमारे, शे.साबीर यांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले.