लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ज्येष्ठ आणि निराधारांना मदतीचा हात देत, संतांनी सोमवारी अनोखी दिवाळी साजरी केली. निमित्त होते ते प्रिंपाळा येथे आयोजित संत पूजन आणि संत मिलन सोहळ्याचे.
खामगाव तालुक्यातील प्रिंपाळा येथे सोमवारी हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून देवगड संस्थानचे मठाधिपती प.पू. भास्करगिरी महाराज, जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराज यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार आकाश फुंडकर, ह.भ.प. गोपाळ महाराज उरळकर, ह.भ.प तुकाराम महाराज (इलोरा), ह.भ.प. नाना महाराज उजवणे अकोला, जागृती परिवाराचे प्रमोद पाटील, वसुधंरा बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष सागर फुंडकर, प्रिंपाळा येथील सरपंच डॉ. विठ्ठल पेसोडे, केतन पेसोडे यांची उपस्थिती होती. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या ह.भ.प. सरुताई पेसोडे यांचा सत्कार करण्यात करण्यात आला. त्यानंतर सरूताई पेसोडे यांच्या दातृत्वातून प्रिंपाळा आणि परिसरातील ज्येष्ठांसह निराधारांना कपड्यांचे वितरण करण्यात आले. महिलांना साडी चोळीची भेट देण्यात आली. या अनोख्या सोहळ्यामुळे सोमवारीच पिंप्राळा येथे दीपावली साजरी झाली. सरूताई पेसोडे यांच्या दातृत्वात देवगड ं संस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराजांनीही मोलाची मदत केली. या सोहळ्याला प्रिंपाळा परिसरातील संत, महंत आणि भाविकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. प.पू. शंकरजी महाराजांच्या प्रवचनानंतर भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.