- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मार्च एन्डींग अवघ्या २५ दिवसांवर आली आहे. परंतू जिल्ह्यातील नगर पालिकांची कर वसूली उद्दिष्टाच्या जवळपासही पोहचली नाही. घाटावरील सर्वच पालिकांमध्ये आतापर्यंत ५० टक्केपेक्षा जास्त वसूली झाली नाही. नगर पालिकांमध्ये मार्च एन्डींग कर वसूली पेंडींग असे चित्र आहे. कर वसूलीच्या आधारावर पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे अनुदान उपलब्ध होण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.कर वसूलीचे लक्ष गाठण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांची सध्या धावाधाव पाहावयास मिळत आहे. कोट्यवधी रुपयांच्या कर वसुलीचे ‘टार्गेट’ पालिकांसमोर आहे. या कर वसुलीच्या आधारावरच पालिकांना वेतनाचे अनुदान उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकांनी कर वसुलीची बाब गांभीर्याने घेऊन वसुलीची मोहीम सुरू आहे. ९० टक्के कर वसूली झाली, तर पालिका कर्मचाºयांच्या वेतनाचे १०० टक्के अनुदान उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.कर वसुलीमध्ये पालिकांची स्थिती पाहता कर्मचाºयांना मोठी कसरत येत्या २५ दिवसात करावी लागणार आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस सर्व व्यवहार पूर्ण करणे व इतर कामकाजही मार्गी लावण्यासाठी शासकीय कार्यालयात युद्धस्तरावर प्रयत्न सुरू होतात. २०१९-२० या आर्थिक वर्षाचा शेवट तोंडावर आला असल्याने प्रशासकीय पातळीवरून विविध कामांना वेग आला आहे. मुदत जवळ येत असल्याने मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीसाठी पालिकांकडून विशेष पथक नेमण्यात आलेले आहे.
कर वसूलीवर पालिका कर्मचाºयांच्या वेतनाचे अनुदान दिल्या जाते. ९० टक्के कर वसूली झाल्यास वेतन अनुदान १०० टक्के मिळते. वसूली पूर्ण करण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.-सचिन गाडे, मुख्याधिकारी,नगर पालिका, मेहकर.