लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : डोणगाव व परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या घरोघरी व बांधावर जाऊन कीटकनाशकांची विनापरवाना विक्री होत आहे. गावामध्येही हॉटेल, दवाखाने, किराणा दुकान इत्यादी ठिकाणावर सुद्धा या किटकनाशकांची विक्री होते. त्यामुळे हा प्रकार तात्काळ थांबविण्यात यावा, यासाठी परवानाधारक कृषी सेवा केंद्र संचालकांनी गुरूवारी पंचायत समिती सभापतींकडे धाव घेतली.डोणगाव व परिसरात गेल्या काही वर्षापासून विविध प्रकारच्या कंपन्या शेतकऱ्यांना मार्गदर्शनाविना औषधे विक्री करत आहेत. आपुºया मार्गदर्शनामुळे शेतकरी परवानाधारक दुकानदाराकडून खरेदी केलेल्या कीटकनाशकांमुळे वरील औषधी एकत्र करून फवारणी करतात. याचे काही ठिकाणी दुष्परिणाम सुद्धा येत आहेत. यामुळे परवानाधारक दुकानदारांना शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागते. विना परवाना किटकनाशकांची खुलेआम विक्री होत असल्याची पडताळणी करून त्यांच्यावर कारवाई, करावी अन्यथा डोणगाव येथील कृषी परवानाधारक कृषी सेवा केंद्राचे संचालक बंद करणार असल्याचे पत्र कृषी सभापती निंबाजी पांडव यांना गुरुवारी देण्यात आले. यावेळी डोणगाव कृषी सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष विनोद प्रभाकर बोंडगे, उपाध्यक्ष नितीन भिकनराव देशमुख, सचिव प्रितेश विजयराव डहाके व सर्व कृषी परवानाधारक संचालक याठिकाणी उपस्थित होते. कृषी सेवा निविष्ठा विक्री करण्याकरता शासनाने नियम व अटी लागू केलेल्या आहे. यामध्ये कृषी निविष्ठा विक्री करणारा हा कृषी पदवीधर असावा. खते, बियाणे व कीडनाशके विक्रीचे परवाने असावेत, असे नियम असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.
शेतकºयांनी मान्यताप्राप्त व परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच कीटकनाशके, बी-बियाणे व खते खरेदी करावीत. खरेदी करताना पक्के बिल घेऊनच बिलाची रक्कम अदा करावी. रस्त्यावरुन किंवा दारावर येणाºया औषधे विक्रेत्याकडून खरेदी करू नये.- सत्येंद्र चिंतलवाड, तालुका कृषी अधिकारी, मेहकर.शेतकºयांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता मान्यताप्राप्त कृषी सेवा केंद्रातनुच कीटकनाशके, बी बियाणे व खते खरेदी करावीत. या प्रकरणाची शहानिशा करण्याकरीता कृषी विभागाला निर्देश देण्यात आले आहेत. यात दोषींवर नियमानुसार उचित कारवाई करावी.- निंबाजी पांडव, पंचायत समिती सभापती, मेहकर.