मोताळा : तालुक्यातील पुन्हई येथील विविध समस्या मार्गी लावण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोताळा पंचायत समिती समोर मंगळवारी उपोषण सुरु केले होते. दरम्यान, सहाय्यक गटविकास अधिकाºयांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. तालुक्यातील पुन्हई येथील रस्त्यांसह नाल्यांची समस्या मार्गी लावा, यासह विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड शाखा पुन्हई यांनी ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाला निवेदन दिले होते. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. परंतु अद्याप आश्वासनाची पूर्तता केली नाही. गावात १२०० वृक्ष लागवडी पैकी केवळ ३०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. शौचालय कामात अनियमितता झाली आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळवारी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. दरम्यान, सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण समाप्त करण्यात आले. या उपोषणाला संभाजी ब्रिगेडचे योगेश पाटील, अमोल देशमुख, गणेश वाघ यांच्यासह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावून समर्थन दर्शविले. उपोषणात संभाजी ब्रिगेडचे प्रशांत सावंग, कृष्णा घोंगटे, दीपक धुरंधर, सागर सोनोने, गोपाळ पानपाटील, अमोल वानखेडे, रवींद्र वानखेडे, निलेश इंगळे, महेंद्र गोरे, अजय सुरडकर, सोपान राऊत, गुणवंत घोंगटे, शंकर शिंदे, श्रीकृष्ण बांगर, शिवसिंग सोनोने आदी सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)
संभाजी ब्रिगेडच्या उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:31 PM
मोताळा : तालुक्यातील पुन्हई येथील विविध समस्या मार्गी लावण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोताळा पंचायत समिती समोर मंगळवारी उपोषण सुरु केले होते. दरम्यान, सहाय्यक गटविकास अधिकाºयांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.
ठळक मुद्दे गावात १२०० वृक्ष लागवडी पैकी केवळ ३०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. शौचालय कामात अनियमितता झाली आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते.