शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

तीच गावे, त्याच उपाययोजना आता दुष्काळी झळा!

By admin | Published: April 04, 2016 2:03 AM

बुलडाणा जिल्ह्यातील ७0 टक्के गावांमध्ये पाणीटंचाई असते.

बुलडाणा : 'नेमेचि येतो पावसाळा' या उक्तीप्रमाणे उन्हाळाही नियमित येतो व येताना बुलडाणा जिल्ह्याच्या नशिबी पाणीटंचाईचा शाप घेऊन येतो. या वर्षी तर दुष्काळाचा चटका बसत आहे. गेल्या दहा वर्षांंंचा आढावा घेतला तर पर्जन्यमान कितीही होवो, जिल्ह्यातील ७0 टक्के गावांमध्ये पाणीटंचाई असते व या गावांमध्ये प्रशासनाने उपाययोजना राबविल्या आहेत. टंचाईची गावे तीच, टंचाई निवारण्यासाठी राबविल्या जाणार्‍या उपाययोजनाही त्याच. खर्च मात्र दरवर्षी वाढताच. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने टंचाईचा खर्च हा जिल्ह्यासाठी पांढरा हत्ती ठरला आहे. बुलडाणा जिल्ह्यात १ हजार ४२७ गावे आहेत. मात्र, या गावांपैकी ६८८ पासून ८८४ गावांमध्ये पाणीटंचाई गेल्या दहा वर्षांंमध्ये राहिलेली आहे. ही टंचाई निवारण्यासाठी दरवर्षी बुडकी घेणे, विहीर खोलीकरण, खासगी विहीर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीपुरवठा, प्रगतीपथावरील नळयोजना पूर्ण करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरती नळ योजना घेणे, हय़ाच उपाययोजना राबविल्या जातात. जिल्ह्यात पाऊस कितीही पडो, टंचाईची गावे मात्र हीच कायम आहेत. बुलडाणा तालुक्यातील हनवतखेड, हतेडी, देवपूर, देऊळघाट, पळसखेड नाईक, येळगाव, अटकळ, पाडळी. चिखलीमधील आंधई, पळसखेड सपकाळ. मेहकरमधील हिवरा साबळे, घुटी, जवळा, पार्डी, बारडा, आंध्रुड, नागापूर, नागेशवाडी. खामगावमधील पिंप्राळा, बोरजवळा, कुंबेफळ, नागापूरवाडी, लोखंडा, निपाणा. शेगाव तालुक्यातील जवळा कुरखेड, माटरगाव, काबरखेड. मलकापूर तालुक्यातील दुधलगाव कुंड, बोरखेड, निमखेड, बेलाड, मलकापूर ग्रामीण. मोताळा तालुक्यातील निपाणा, दाभाडी, टाकळी वाघजाळ, जहांगीरपूर, धोलखेड, सारोळा मारोती, नाईकनगर, लपाली, कोल्हीगवळी, नळकुंड, डिडोळा खुर्द. नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी, भालेगाव, वडगाव डिघी, वडगाव नवे, सावरगाव, शेंबा, पोफळी, तांदूळवाडी, फुली, टाकरखेड, खैरा, शेंबा खु., खेडी व चांदुरबिस्वा हीच गावे आलटून पालटून टंचाईग्रस्त राहिलेली आहेत. या गावांमध्ये उपाययोजना होतात; मात्र त्या केवळ टंचाईपुरत्याच. कायमस्वरूपी उपाययोजना शासन करणार का? हा प्रश्न मात्र दरवर्षी अनुत्तरीतच राहतो.