शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
4
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
5
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
6
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
8
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
9
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
10
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
11
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
12
"भाजप विरोधी होणे गुन्हा आहे का? आम्ही त्यालाच मतदान करणार जो..."; अविमुक्तेश्वरानंद महाराष्ट्रात कुणासोबत?
13
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
14
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?
15
मोठी बातमी: भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले शिवसेनेच्या तिकिटावर लढणार?; शिंदेभेटीमुळे भुवया उंचावल्या
16
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?
17
प्रेरणादायी! ४ वेळा नापास, परीक्षेच्या आदल्या रात्री पॅनिक अटॅक; UPSC क्रॅक करून केली कमाल
18
महाराष्ट्र निवडणुकीत संघानं बनवली रणनीती; कोणकोणत्या मुद्द्यांवर करणार प्रचार?
19
कुठे हसू तर कुठे अश्रू! न्यूझीलंडच्या महिला चॅम्पियन; आफ्रिकेच्या पोरींच्याही पदरी निराशा Photos
20
"हा माझा चॉईस नव्हता, पण..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री?, आता केला मोठा खुलासा

Samruddhi Mahamarg Accident: बर्वे-बोरुडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर; अर्टिगा तीन-चारवेळा उलटली, समृद्धी महामार्गावरील अपघातात मृतांची नावे...

By संदीप वानखेडे | Published: March 12, 2023 1:37 PM

समद्धी महामार्गावर भीषण अपघात, सहा जण ठार तर सात जखमी. शिवणी पिसा नजीकची घटना

मेहकर (बुलढाणा) : समृद्धी महामार्गावर भरधाव इरटिका कार उलटल्याने सहा जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. ही घटना मेहकर-सिंदखेड राजा दरम्यान लोणार तालुक्यातील शिवणी पिसा जवळ १२ मार्च राेजी सकाळी ८ वाजता घडली. चार जणांचा जागीच तर दाेन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृतांमध्ये हाैसाबाई भरत बर्वे (वय ६५), श्रद्धा सुरेश बर्वे (वय २८), किरण राजेंद्र बाेरुडे (वय २८), प्रमिला राजेंद्र बाेरुडे (वय ५२), भाग्यश्री किरण बाेरुडे (वय २५), जान्हवी सुरेश बर्वे (वय ११) सर्व रा़ एन ११ हुडकाे, छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील बाेरुडे आणि बर्वे कुटुंब शेगाव येथे अर्टिगा कारने रविवारी सकाळी जात हाेते़ दरम्यान, मेहकर-सिंदखेड राजा दरम्यान लोणार तालुक्यातील शिवणी पिसा जवळ असलेल्या पुलाजवळील खचक्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले़ त्यामुळे कार रस्त्याच्या मधाेमध असलेल्या मिडीयमध्ये शिरल्याने उलटली. तीन ते चार वेळा उलटल्याने कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला फेकली गेली़. यामध्ये चार जण जागीच ठार तर दाेन जणांचा मेहकर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच सात जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेत जखमींना तातडीने मेहकर येथील खासगी रुग्णालयात हलवले़.

जखमींमध्ये कार चालक सूरेश भरत बर्वे (वय ३५) , नम्रता रविंद्र बर्वे (वय ३२),इंद्र रविंद्र बर्वे (वय १२), साैम्य रविंद्र बर्वे (वय ४ वर्ष), जतीन सुरेश बर्वे (वय ४ वर्ष), वैष्णवी सुनील गायकवाड (वय १९ वर्ष), यश रविंद्र बर्वे (वय १०) आदींचा समावेश आहे़. या जखमींवर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़. अपघातस्थळी पाेलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी पाहणी केली. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मेहकर तालुका शिवसेना प्रमुख सुरेशतात्या वाळूकर, जयचंद बाटीया, प्रा़ आशिष देशपांडे,विलास आखाडे ,सागर कडभणे, नवंदु चौधरी, नायब तहसीलदार अजय पिम्परकर, डॉ़ योगीता शेजुळ, एएनएम चराटे , गजानन सौभागे आदींसह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली़

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात