लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: जीवनातील विविध संस्कार हे उत्तम चारित्र्याचे आभूषण आहेत. संस्कारामुळेच समाज आणि परमात्म्याची सेवा घडते. मानवी जीवनात संस्कारांना अनन्यसाधारण महत्व आहे. याउलट संस्कार नसतील मनुष्य आणि प्राणी दोन्हीही एकसारखे मानायला काहीही हरकत नसावी, असा अमृतमयी उपदेश जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू.शंकरजी महाराज यांनी येथे दिला.
शेलोडी येथे आयोजित जागृती परिवाराच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या जीवनसेवाव्रती राधादीदी, सुमित्रादीदी, ह.भ.प. काळे महाराज यांची उपस्थिती होती. यावेळी प.पू. शंकर महाराज पुढे म्हणाले की, सेवा कार्यासाठी २० वर्षांपूर्वी जागृतीची स्थापना करण्यात आली. हजारो हात जागृतीच्या सेवाकार्यात लागले. अनेकांच्या परिश्रमातून, त्यागातून जागृतीचा वटवृक्ष झाला. मात्र, समाज उत्थानाचे हे कार्य सहजासहजी घडले नाही. समाज उत्थानाच्या या मार्गात खूप त्रास झाला. दु:ख आलीत. काहींनी खूप त्रास दिला. या कालावधीत पेरलं ते उगवलच नाही, याची कायम खंत राहील. मात्र, त्रास देणाºयांपेक्षा समाज उत्थानांच्या कार्यात झोकून देणाºयांची संख्या ही कितीतरी पटीने अधिक आहे. हीच माझी आणि जागृतीचे बळ आहे. म्हणूनच कितीही त्रास झाला, तरी यापुढे समाज उत्थानाच्या कार्यापासून आपण अजिबात दूर जाणार नाही. भविष्यात येणाºया प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी आपण सक्षम असल्याची ग्वाही दिली. ही ग्वाही दसरा मेळाव्याला उपस्थित भाविकांना ‘गुरूदक्षिणा’च मिळाली. एका मोठ्या दु:खद प्रसंगानंतर जागृती पिठात आयोजित हा पहिलाच दसरा मेळावा होता. त्यामुळे या मेळाव्याला भाविकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. यावेळी अशोक राऊत यांच्यासह जागृतीच्या सेवा कार्यात झटणाºयांचा सत्कार करण्यात आला.जागृती परिवाराचे प्रमोद पाटील यांच्यासह हजारावर भाविकांची यावेळी उपस्थिती होती.
शुभ दर्शनाचा ‘डोळा’ महत्वाचा!
सत्यदर्शन होत नाही, त्यांना डोळे म्हणून नये. संवदेना कळत नाही,ते मन नाही आणि अंतकरणात प्रेम नाही ते जीवनव्यर्थ आहे. अंतरात्मा आणि परमात्म्याचा आवाज ऐकू येत नाही, त्यांना कान म्हणू नये, असे नि:क्षून सांगतानाच, आलेलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा, कधी नेतृत्व करून तर कधी सेवाधारी होवून समाजाचे कल्याण करा!, असा उपदेशही त्यांनी यावेळी दिला.