लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : मेहकर येथे असलेली महसूल इमारत ही शेकडो वर्षांपूर्वी इंग्रजांनी बांधली होती. सदर इंग्रजकालीन इमारत जीर्ण झाल्याने मोडकळीस आलेली आहे. याबाबत आ.संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नाने नवीन प्रशासकीय इमारतीला मंजुरात मिळाली असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती, आ. संजय रायमुलकर यांनी दिले.स्थानिक शासकीय विश्रामगृहावर ८ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आ.संजय रायमुलकर बोलत होते. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळुकर, शहरप्रमुख जयचंद बाठिया उपस्थित होते. यावेळी आ.रायमुलकर म्हणाले, की मेहकर येथे असलेली महसूलची इमारत ही इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेली आहे. शेकडो वर्षांपूर्वीची बांधलेली जुनी इमारत असल्याने ही मोडकळीस आलेली आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी असलेल्या विभागामध्ये पावसाचे पाणी गळते, त्यामुळे अनेक महत्त्वाचे दस्तावेज खराब होतो. काही ठिकाणच्या भिंतीला भेगा पडल्या आहेत. अशा परिस्थितीत अधिकारी, कर्मचारी यांना काम करण्यास अडचणी येतात, तर शहराच्या मुख्यभागी ही इमारत असल्याने सर्वसामान्यांनासुद्धा याचा त्रास होतो. त्यामुळे शहराच्या बाहेर नवीन इमारत व्हावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात आली आहे. या परिस्थितीत खा.प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन इमारत व्हावी, यासाठी संबंधित विभागाचे मंत्री, प्रधान सचिव, वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. अखेर याला यश येऊन खंडाळा रोडवर सदर प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळाली असून, या इमारतीच्या कामासाठी ११ कोटी ४८ लाख ५४ हजार ७0७ मंजूर झाले आहेत. यामध्ये मुख्य इमारत, अंतर्गत विद्युतीकरण, बाह्य विद्युतीकरण, पाणी पुरवठा व मलनिस्सारण, आवारभिंत व गेट, अंतर्गत रस्ते, शिडीवर्क व पेव्हिंग ब्लॉक, सी.सी. ड्रेन, पथदिवे, पार्किंग व्यवस्था, रेनवॉटर हार्वेस्टिंग, अग्निशमन यंत्रणा, जमीन सुधारणा यासह इतरही आवश्यक ती कामे करण्यात येणार असल्याचे आ.संजय रायमुलकर यांनी सांगितले.
मेहकर येथे महसूलच्या नवीन इमारतीला मंजुरी - संजय रायमुलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:27 IST
मेहकर : मेहकर येथे असलेली महसूल इमारत ही शेकडो वर्षांपूर्वी इंग्रजांनी बांधली होती. सदर इंग्रजकालीन इमारत जीर्ण झाल्याने मोडकळीस आलेली आहे. याबाबत आ.संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नाने नवीन प्रशासकीय इमारतीला मंजुरात मिळाली असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती, आ. संजय रायमुलकर यांनी दिले.
मेहकर येथे महसूलच्या नवीन इमारतीला मंजुरी - संजय रायमुलकर
ठळक मुद्देइंग्रजकालीन महसूलची इमारत मोडकळीस इमारतीच्या कामाला होणार सुरुवात!