लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: येथील शासकीय गोदाम परिसरातील मोकळ्या जागेवर असलेला बेवारस १० ब्रास रेतीसाठा जप्त केल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. जप्त केलेला रेतीसाठा कुणाचा आहे, याचा तपास आतापर्यंत लागला नाही. त्यामुळे याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.रेती उत्खननावर सध्या बंदी आहे. परंतू अवैध रेती उत्खनन करून शहरात रेती साठवण केली जात असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे यांना मिळाली. महसूल विभागाच्या पथकाने तपास केला असता, शासकीय गोदाम परिसरातील रोड लगत असलेल्या मोकळ्या मैदानावर १० ब्रास रेती साठा बेवारस स्थितीत आढळून आला. या वाळ् साठ्याचा पंचनामा करून तो जप्त करण्यात आला आहे. सध्या हा रेतीसाठा तहसील कार्यालयाच्या परिसरात ठेवण्यात आला आहे. यावेळी नायब तहसीलदार विद्या गौर, तलाठी गणेश देशमुख व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. रेतीसाठा नेमका कोणी करून ठेवला याचा शोध लागलेला नाही. पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती तहसीलदार संतोष शिंदे यांनी दिली.
बेवारस रेतीसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 3:40 PM