शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

संग्रामपूर, नांदुरा, जळगाव तालुक्यात वादळासह गारपिटीचा तडाखा

By सदानंद सिरसाट | Published: February 26, 2024 10:44 PM

वादळीवाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने वीज पुरवठा खंडित झाला.

सदानंद सिरसाट, खामगाव (बुलढाणा) : घाटाखालील नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील काही गावांमध्ये सोमवारी सायंकाळनंतर ते रात्री उशिरापर्यंत वादळीवाऱ््यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. त्यामध्ये नांदुरा तालुक्यातील डिघी, येरळी, दादगाव, कोदरखेड तर जळगाव जामोद तालुक्यात हिंगणा मानकर, सुनगाव. संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानोदा, वरवट बकाल, वडगाव वान यासह अनेक गावांमध्ये संत्र्यासह गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, मका भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

- संग्रामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

संग्रामपूर : सोमवारी रात्री संग्रामपूर तालूक्यातील विविध पिकांना वादळी वाऱ्यासह गारपीटीचा तडाखा बसला. त्यामुळे संत्र्यासह गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, मका भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने अगोदरच आर्थिक डबघाईस आलेला शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यात असंख्य गावांमध्ये वादळीवाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने वीज पुरवठा खंडित झाला.

सोमवारी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने हाहाकार माजविल्याने रब्बी पिकांसह फळ पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. संग्रामपूर तालूक्यात गहू, ५१३ हेक्टर, हरभरा १५ हजार ९३२ हेक्टर, रब्बी ज्वारी ३७२ हेक्टर, मका ५२२ हेक्टर, कांदा १ हजार ३१७ हेक्टर, भाजीपाला ३५ हेक्टर तर इतर रब्बी पिके १९ हेक्टर असे एकूण १८ हजार ७१० हेक्टरवर रब्बी पिके बहरलेली आहेत. तसेच फळ पिकांमध्ये संत्रा ३ हजार ३२९ हेक्टर, आंबा ६.२ हेक्टर, सीताफळ ३८ हेक्टर, लिंबू २१० हेक्टर, डाळींब १६.२ हेक्टर, पपई १५ हेक्टर, केळी ४५० असे एकूण ४ हजार ६४ हेक्टर जमिनीवर फळ पिके बहरलेली आहेत. यामध्ये सर्वाधिक संत्र्याच्या बागा असून संत्र्याचा मृगबहार तोडणीला आला आहे. दरम्यान सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पाऊस तसेच गार पडल्याने सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा