- अझहर अलीसंग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील ग्राम टाकळेश्वर येथे मंगळवारी एका बकरीने एक-दोन नव्हे तर तब्बल पाच पिल्लांना जन्म दिला आहे. आश्चर्यचकित करणार्या या घटनेची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी सूरू केली आहे. टाकळेश्वर या गावातील सिद्धार्थ गव्हांदे हे अल्पभूधारक शेतकरी असून पशुपालनही करतात. त्यांच्याकडे गुरढोरं, कोंबड्यांसह बकय्रांचा कळप आहे. मागील कित्येक वर्षापासून त्यांचा बकरी पालन व्यवसाय आहे. बकरी पालन व्यवसाय जोडधंदा म्हणून करीत असतात. मंगळवारी रोजी त्यांच्या बकऱ्यांच्या कळपातील एका बकरीने तब्बल पाच पिलांना जन्म दिला. त्यात दोन नर तर तीन मादी जातीचा समावेश आहे. हि बकरी कुठुनही विकत घेतली नसून कळपातील आहे. कळपातच परंपरागत पद्धतीने वाढली. या अगोदर याच बकरीने दोन पिल्लांना जन्म दिला होता. मंगळवारी मात्र पाच पिल्लांना जन्म दिला. पाच पिल्ले व बकरीची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती गव्हांदे यांनी दिली.
संग्रामपूर तालुक्यात बकरीने दिला पाच पिल्लांना जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 12:33 PM