संग्रामपुर: अतिरेक्यांनी गुरूवारी जवानांवर केलेल्या हल्ल्याच्या पुष्ठभुमीवर शनिवारीही संग्रामपुर तालुक्यातील नागरीकांमध्ये दहशतवाद्यांना अभय देणाय्रा पाकिस्थान देशा विरूध्द संतापाची लाट आहे. त्यानिषेधार्थ ठिकठिकानी स्वयंफुर्तीने नागरीकांडुन कडकडीत बंद पाडण्यात आले. जम्मू-काश्मीरातील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गुरुवारी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संग्रामपुर तालुक्यात शनिवारी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाडण्यात आले. तालुक्यातील संग्रामपूर, वरवट बकाल, बावनबीर, टुनकी, सोनाळा या प्रमुख बाजापेठांसह ईतरही गावांमध्ये कडकडीत बंद पाडण्यात आले. अतिरेक्यांनी जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पुष्ठभूमीवर नागरीकांमध्ये तीव्र संताप आहे. शनिवारी सकाळी ठिकठिकाणी गावातुन नागरीकांनी निषेध रँली काढली. पाकीस्थान मुर्दाबाद अशा धोषणा देत निषेध नोदवीण्यात आले. तालुक्यातील टुनकी येथील असंख्य नागरीकांनी मुंडन करून धटनेचा निषेध नोदविला. शुक्रवारीही नागरीकांमध्ये संतापाची लाट होती तालुक्यातील सर्वच गावांमध्ये रात्री उशीरा पर्यंत स्काँडल मार्च, निषेध रँली, व शहीद जवानांना श्रध्दांजली देण्याचे कार्यक्रम धेण्यात आले. पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ४४ जवान शहीद झाले. या घटनेचा तालुकाभर निषेध नोदविण्यात येत असुन नागरीकांमध्ये संताप आहे.
संग्रामपुर तालुक्यात स्वयंफुर्तीने कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:33 PM