लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: शहरात १८ सप्टेंबर रोजी विनयभंग करण्याच्या दोन घटना घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. पीडितांमध्ये ४0 वर्षीय विवाहिता व १७ वर्षीय विद्यार्थिनीचा समावेश असून, पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे.पहिल्या घटनेत ४0 वर्षीय महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शहरातील अजिम खान (वय २४) याने त्याच्या मोबाइलवरून अश्लील संवाद साधला. याबाबत सदर महिलेच्या मुलाने अजिम खान यास विचारणा केली असता अजिम खान याचा भाऊ शे. हनिफ शे. इब्राहीम, शे. हमिद शे. हनिफ, जायदाबी या तिघांनी त्यास मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अजिम खान, जायदाबी, शे. हनिफ शे. इब्राहीम, शे. हमिद शे. हनिफ यांच्यावर अप नं. १६७/१७ कलम ३५४ (ड), ५0४, ५0६, ३२३, अनु. जा ती जमाती अँक्ट्रासिटी अँक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी अजिम खानला अटक केली आहे. तर दुसर्या घटनेत १७ वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शे. अकबर (वय २१) हा तिचा पाठलाग करीत होता. १८ सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर बसस् थानक परिसरात त्याने जीवे मारण्याची धमकी दिली व विनयभंग केला. यामध्ये शे. नईम शे. कलीम हा नेहमीच शे. अकबर याची साथ देत होता. यावरून तामगाव पोलिसांनी शे. अकबर व शे. नईम शे. कलीम यांच्या विरुद्ध अप नं. १६८/१७ कलम ३५४ (ड), ५0९, ५0६, ३४ भादंविसह कलम ११/१२ लैंगिक अत्याचार बालसंरक्षण कायदा २0१२ (पॉस्को) नुसार गुन्हा दाखल केला आहे.दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीश बोबडे, जळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप साळुंके आदींनी भेट दिली असून, शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. -
विनयभंगाच्या घटनांमुळे संग्रामपुरात तणाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:06 AM
संग्रामपूर: शहरात १८ सप्टेंबर रोजी विनयभंग करण्याच्या दोन घटना घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. पीडितांमध्ये ४0 वर्षीय विवाहिता व १७ वर्षीय विद्यार्थिनीचा समावेश असून, पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे.
ठळक मुद्देपीडितांमध्ये ४0 वर्षीय विवाहिता व १७ वर्षीय विद्यार्थिनीचा समावेश पोलिसांचा चोख बंदोबस्त