शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

विलुप्तप्राय औषधी वनस्पतींना बुलडाण्यात संजीवनी!

By admin | Published: September 07, 2014 12:37 AM

अमरावती विभागात केवळ बुलडाणा जिल्ह्याची निवड; ७५ हजार वनौषधी रोपट्यांची लागवड.

खामगाव: र्‍हासाच्या मार्गावर असलेल्या अनेक औषधी वनस्पतींना बुलडाणा जिल्ह्यात संजीवनी लाभली आहे. र्‍हास पाऊ लागलेल्या औषधी वनस्पतींच्या लागवड आणि संगोपनासाठी बुलडाणा जिल्ह्यातील दहा वनग्रामांची निवड करण्यात आली आहे. यासाठी या वनग्रामांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आयुर्वेदिक मंडळाच्या वतीने प्रत्येकी पाच लक्ष ६७ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. औषधी रोपवन लागवडीसाठी अमरावती विभागात केवळ बुलडाणा जिल्ह्याची निवड झाली आहे.गत काही वषार्ंत बुलडाणा जिल्हा वन संवर्धनात अग्रेसर राहीला आहे. जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे अमरावती वन परिक्षेत्रात बुलडाणा जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आता जिल्ह्यातील दहा वनग्रामांची राष्ट्रीय आयुर्वेदिक औषधी महामंडळाकडून औषधी रोपवन लागवडीसाठी निवड झाली आहे. या दहा वन ग्रामांमध्ये २५0 हेक्टरवर दोन लक्ष ७५ हजार औषधी वृक्ष रो पट्यांची लागवड करण्यात आली आहे. र्‍हास पाऊ लागलेल्या औषधी वनस्पती व वृक्षांचे संगोपन करण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे. औषधी रोपवनासाठी अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्याची निवड झाली असल्याच्या वृत्तास वन परिक्षेत्र अधिकारी शिवाजी दहीवाल यांनी दुजोरा दिला. ** बहुपयोगी औषधी वनस्पतींचे जतनगेल्या काही वर्षांंत वृक्षतोड आणि जगंलांच्या हानीमुळे अनेक वनौषधी र्‍हास पावत आहेत; मात्र विविध औषधी वनस्पतींचे जतन करण्याचा मह त्वकांक्षी प्रकल्प केंद्र शासनाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. यासाठी राष्ट्रीय आयुर्वेदिक मंडळाकडून औषधी रोपवनासाठी वनग्रामातील २५ हे क्टर वन परिक्षेत्रात लागवडीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले असून, प्रत्येक वन ग्रामामध्ये २७ हजार ५00 वनौषधींची लागवड करण्यात आली आहे.** या वनस्पतींची केली लागवडजिल्ह्यातील दहा वनग्रामांसाठी पाच कोटी ७0 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या योजनेंतर्गत अडुळसा, शतावरी, तुळस, अश्‍वगंधा, आवळा, हिरडा, बेहडा, नीम, करंज, बिबा, अर्जून, मुरडशेंग, मुश्कंद, पुत्रजिवा, कांचन, शिकेकाई, निगरुडी कड, आदी औषधी वनस्पती आणि औषधी वृक्षांची लागवड केली जात आहे. या वनस्पतींची रोपटी औरंगाबाद, जळगाव, हिंगणघाट, अमरावती, नागपूर या ठिकाणांहून आणण्यात आली आहेत.