चिखली : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून ‘लोकमत समूहा’व्दारे ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही महाराष्ट्रातील सर्वात भव्य रक्तदान मोहीम राबविली जात आहे. याअंतर्गत राज्यभरात रक्तदानाचे महायज्ञ होत आहे. यातीलच एक महायज्ञ रेणुका नगरी चिखली येथे १४ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. यासाठी चिखलीकरांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून या रक्तदानाच्या या महायज्ञात विक्रमी सहभाग नोंदविण्यासाठी सर्वचजण सरसावले आहेत.
राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीपासून ‘लोकमत-रक्ताचं नातं’ या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत राज्यभरात रक्तदान शिबीर पार पडत आहेत. याअंतर्गत चिखली येथे १४ जुलै रोजी स्थानिक संत सावता माळी भवन मध्ये सकाळी १० वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदानासाठी आवाहन
रक्तदानासाठी यांचे आवाहन
चिखली येथील महायज्ञात रक्तदानासाठी राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, चिखलीच्या आमदार श्वेता महाले, माजी आमदार राहुल बोंद्रे, नगराध्यक्षा प्रिया कुणाल बोंद्रे, उपनगराध्यक्षा वजीराबी शे. अनिस, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्त, अंबिका अर्बनचे अध्यक्ष अॅड.विजय कोठारी, महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे संस्थापक प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे, माजी नगराध्यक्ष सलीम मेमन, मुंगसाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक देशमाने, श्रीराम नागरीचे अध्यक्ष पंडितराव देशमुख, न.प.गटनेते मो. आसिफ, नगरसेवक रफिक कुरेश, प्रा. डॉ. राजू गवई, दीपक खरात, नामू गुरुदासाणी, विजय नकवाल, दत्ता सुसर, गोपाल देव्हडे, गोविंद देव्हडे, राजू रज्जाक, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. म. इसरार, शिवसेना तालुका प्रमुख कपिल खेडेकर, शिवराज पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहीत खेडेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, नितीन राजपूत, तसेच गजू तारू, अमित वाधवानी, सचिन शेटे, बाळू भिसे, संजय अतार, अनिल वाकोडे, तुषार बोंद्रे, रवींद्र तोडकर, शेखर बोंद्रे, शे.इम्रान, जका ठेकेदार, नजीर कुरेशी, अनवर कुरेशी, अन्सार कुरेशी, चेतन देशमुख, सागर पुरोहित, साबीर शेख, शहेजाद शेख, भारत जोगदंडे, परवेज जमदार, तन्जीम हुसेन, समिर शेख, अकरम मेमन सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले आहे़
सामाजिक संघटनांचेही आवाहन
विघ्नहर्ता गणेश मंडळ, संत गजानन महाराज भक्त मंडळ, तुळजा भवानी गणेश मंडळ, भाईजान ग्रुप, सुप्रभात ग्रुप, गुड मॉर्निंग ग्रुप, केजीएन ग्रुप, ब्लड डोनर ग्रुप चिखलीसह विविध संस्था, संघटना, पतसंस्था आदी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून रक्तदानाचे आवाहन करण्यात येत आहे.