प्रारंभी काढण्यात आलेल्या आरक्षणामध्ये संबंधित गावात त्या प्रवर्गातील व्यक्तीच सदस्य म्हणून निवडून न आल्यामुळे या गावातील सरपंचपदाची निवडणूक रखडली होती. संबंधित गावांसाठी सरपंचपदाचे आरक्षण त्यामुळे नव्याने करावे लागणार होते. ते चार मार्च रोजी काढण्ात आले होते. दरम्यान, प्रारंभी ५२७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी होवून १८ जानेवारी रोजी निकाल लागला होता. सोबतच ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान ४९३ ग्रामपंचायतींमधील सरपंच-उपसरपंचांची निवडणूक झाली होती. त्यांचे कामकाजही नंतर सुरू झाले. मात्र काही ठिकाणी सरपंच पदाचा फैसला अगोदर काढलेल्या आरक्षणामुळे होऊ शकला नाही, अश्या प्रलंबित सरपंच पदाची निवडणूक १९ मार्च रोजी दुपारी आता होणार आहे.
--या गाात होणार सरपंच निवडणूक--
नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार, माळेगाव गौड आणि आलमपूर येथे सरपंचपदाची निवडणूक होईल. यासोबतच नांदुरा तालुक्यातील पुन्हई , कोथळी ,अंतरी , टाकळी वाघजाळ, संग्रामपूर तालुक्यातील वरवट खंडेराव, पातुर्डा खुर्द, रुधाना, तामगाव, आलेवाडी, मेहकर तालुक्यातील अरेगाव, मलकापूर तालुक्यातील वरखेड, चिखली तालुक्यातील दिवठाणा, जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ बुद्रूक, वडशिंगी, बुलडाणा तालुक्यातील अजिसपूर, सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपरखेड, लोणार तालुक्यातील गोत्रा, खामगाव तालुक्यातील गवंढाळा येथे सरपंचपदाची निवडणूक होईल.