खामगाव: महाराष्ट्राचे माजी कृषी व फलोत्पादन मंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर शुक्रवारी, १४ सप्टेंबर रोजी खामगाव दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी फुंडकर कुटुंबियांची त्यांच्या माधव नगर स्थित "वसुंधरा" निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दर्शन घेऊन फुंडकर कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी सुनिताताई फुंडकर, सागर फुंडकर व आमदार आकाश फुंडकर व कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा केली. यावेळी भागवत यांनी लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या सोबतच्या सहवासाबाबत काही आठवणींना उजाळा दिला. व आपल्या संवेदना व्यक्त करून लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली फुंडकर कुटुंबियांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 2:20 PM