मंत्री अब्दुल सत्तार यांचा १४ सप्टेंबर रोजी जिल्हा दौरा होता. या अनुषंगाने १३ सप्टेंबरला चिखली येथे ते मुक्कामी होते. चिखली येथील अभिजित राजपूत यांचे वडील सेवानिवृत्त अभियंता नारायणसिंग राजपूत व मंत्री सत्तार यांचे जुने ऋणानुबंध आहेत. या पृष्ठभूमीवर अत्यंत व्यस्ततेही त्यांनी अभिजित राजपूत यांच्या निवासस्थानी भेट दिली. दरम्यान, राजपूत यांनी आपल्या निवासस्थानी मंत्री सत्तार यांना चांदीची तलवर भेट देऊन व शाल, श्रीफळ देऊन जंगी स्वागत केले. दरम्यान, सत्तार यांनी राजपूत परिवाराशी कौटुंबिक चर्चा करून नियोजित कार्यक्रमासाठी ते रवाना झाले. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, शिवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर, प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे, भास्करराव मोरे, मनोज राऊत, पुष्पा व नारायणसिंग राजपूत, नेहा व दिग्विजय राजपूत, रेणुका व अभिजित राजपूत, अश्विनी व विक्रांत राजपूत, आदी उपस्थित होते.
मंत्री सत्तारांची विविध नेत्यांच्या घरी सदिच्छा भेट !
मंत्री अब्दुल सत्तार यांचे चिखलीत अनेकांशी जिव्हाळ्याचे नाते आहे. या अनुषंगाने नियोजित दाैऱ्याच्या एक दिवस आधी चिखलीत दाखल होत त्यांनी अभिजित राजपूत यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख कपिल खेडेकर, शिवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर, बाजार समितीचे मुख्य प्रशासक नंदकिशोर सवडतर, माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे यांच्या निवासस्थानी देखील सदिच्छा भेट दिली.