बुलडाणा : शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १७३ केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा १२ ऑगस्ट राेजी पार पडली. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या १५ हजार ८२८ पैकी १४ हजार ५१८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. १३१० विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित हाेते.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने १२ ऑगस्ट राेजी इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च माध्यमिक व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १५ हजार ८२८ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली हाेती. इयत्ता पाचवीच्या बुलडाणा तालुक्यातील ९३२, चिखली १ हजार २२९, देऊळगाव राजा ४५५, सिंदखेडराजा ५२८, मेहकर ७७३, लाेणार ६८९, खामगाव ८९३, शेगाव ४४५, संग्रामपूर ३१५, जळगाव जामाेद ६२१, नांदुरा ३५८, मलकापूर ६३६, माेताळा ४१५ अशा ८ हजार २८९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
इयत्ता आठवीच्या बुलडाणा तालुक्यातील ७९३, चिखली १२०४, देऊळगाव राजा ३४५, सिंदखेडराजा ३७१, मेहकर ५९३, लाेणार ६०४, खामगाव ५८६, शेगाव ३४७, संग्रामपूर २०५, जळगाव जामाेद ३२७, नांदुरा २७४, मलकापूर ३३५, माेताळा २४५ अशा ६ हजार २२९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
काेराेनाविषयक नियमांचे पालन
काेराेनाविषयक नियमांचे पालन करून जिल्ह्यातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला विद्यार्थ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. केवळ १३१० विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित हाेते. उपशिक्षणाधिकारी उमेश जैन यांनी विविध परीक्षा केंद्रांवर भेट देऊन पाहणी केली.