असा करावा अर्ज
डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपुणे डॉट इन आणि डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपीयूपीपीएसएस डॉट इन या वेबसाईटवर वेळापत्रक, माहितीपुस्तिका आणि अर्ज उपलब्ध आहे. ज्या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी इच्छुक असतील, ते विद्यार्थी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे आपली नावे कळवितात. मुख्याध्यापक ती नावे एकत्रित करून शिक्षण विभागामार्फत शासनाकडे पाठवितात.
कोरोनाचे कारण देत पुढे ढकलली परीक्षा
१) कोरोनाचा कहर हा कमी न होता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा त्रास हा शालेय विद्यार्थ्यांना होऊ नये, यासाठी ही परीक्षा
पुढे ढकलण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.
२) कोरोनाचा फैलाव हा कमी झालेला नाही, सुरक्षितता म्हणून केवळ तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. ही परीक्षा मे
महिन्यात होणार असली तरी त्यात बदल होऊ शकतो.
३) परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनी अभ्यास सुरू केला होता; पण आता हीच परीक्षा पुढे ढकलण्याचे
नियोजन केल्यामुळे अभ्यासाला वेळ मिळणार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा - २३ मे
ऑनलाईन अर्ज भरता येणार - १० एप्रिलपर्यंत