बुलडाणा : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती याेजना परीक्षा (एनएमएमएस) २१ मार्च राेजी राज्यभरात विविध केंद्रावर हाेणार हाेती. मात्र, महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा २१ मार्च राेजी घेण्याची घाेषणा केली आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आता ही परीक्षा ६ एप्रिल राेजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती याेजना परीक्षा (एनएमएमएस) २१ मार्च राज्यभरात ३७ जिल्ह्यांतील ७६१ उपकेंद्रांवर घेण्यात येणार हाेती. ही परीक्षा इयत्ता आठवीसाठी घेण्यात येते. मात्र, एमपीएससीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा १४ मार्चऐवजी २१ मार्च राेजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता राज्यभरातील केंद्रावर ६ एप्रिल राेजी हाेणार आहे. या परीक्षेसाठी बुलडाणा जिल्ह्यातील २ हजार १०८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:34 AM