बुलडाणा: ‘आमची शाळा, आमच्या गावाचा अलंकार’ हे ब्रीद घेऊन अंत्री देशमुख येथील जिल्हा परिषद शाळेने गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. शाळेला डिजीटल करणे, विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे यावरच शाळेने आपली प्रगती थांबविली नाही; तर वेगवेळ्या क्षेत्रात पुरस्कारही प्राप्त केले. बक्षीसांचा खजिना असलेल्या या शाळेने आयएसओनंतर आता ‘इंटरनॅशलन स्कूल’चे मिशन ठेवले आहे.मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथील जिल्हा परिषद शाळा स्वातंत्र्यापूर्वीची शाळा आहे. या शाळेने आयएसओ मानांकन पटकाविल्यानंतर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात कमतरता केली नाही. पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गासाठी असलेले ५२० प्रकारचे वेगवेगळे प्रयोग असलेली नाविन्यपूर्ण प्रयोग शाळा याठिकाणी आहे. शाळेचे पुढचे लक्ष आंतरराष्ट्रीय शाळा निर्मिती (इंटरनॅशनल स्कूल) हे आहे. त्यादृष्टीने शाळेचे प्रयत्न दिसून येतात. ही शाळा आतापर्यंत विविध क्षेत्रामध्ये अव्वल आली आहे. त्यामुळे येथील शिक्षकांसोबत शाळाही आदर्श झाली आहे. या शाळेचे यश हे सर्व शिक्षकांच्या चांगल्या कामाची पावती आहे.
पारितोषीकांची सफर...अंत्री दे. येथील माजी मुख्याध्यापक स्व. जुलालराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला पारितोषीकांची सफर आतापर्यंत कायम आहे. ही परंपर आजही येथील शिक्षकांनी जपली आहे.
प्रत्येक स्पर्धेत आघाडीया जि. प. शाळेने १९९८ मध्ये विज्ञान प्रदर्शन तालुकास्तर प्रथम व केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक, १९९९ मध्ये केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम, २००२ मध्ये विज्ञान प्रदर्शन तालुकास्तर प्रथम, २००८, ०९ मध्ये विज्ञान प्रदर्शन व निबंध स्पर्धेत प्रथम, २००९ मध्ये जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट संगणक कक्ष, २००३ ते ०५ आणि त्यानंतर २०१५ ते १८ मध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सलग विजेतेपद,२०१० ला शैक्षणिक गुणवत्ता विकास जिल्ह्यातून तृतिय, २०१९ मध्ये आएसओ मानांकन प्राप्त केले.गेल्या २२ ते २३ वर्षापासून शाळेचा प्रत्येक क्षेत्रातील दबदबा कायम आहे. प्रगतीचा आलेख हा चढता आहे. ग्रामस्थांच्या योगदानाच्या माध्यमातून शाळेची प्रगती चांगली आहे.-जी. के. देशमुख, शिक्षक़आम्ही आमच्या पाल्यांच्या प्रगतीवर खुश आहोत. शाळेसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. शाळेने गुणवत्ता जपली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे शिक्षकांचे पुरेपूर लक्ष असते.-रामेश्वर नाईकवाडे, पालक