लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : घाटबोरी येथील एम.सी.डी.न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत रंगपंचमीच्या दिवशी नैसर्गिक रंग खेळण्याची २८ फेब्रुवारी रोजी शपथ घेतली.विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नैसर्गिक व कोरडे रंग खेळण्याची विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. त्यावेळी संस्थेचे विश्वस्त संतोष डोंबळे यांनी होळी व रंगपंचमीचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला शाहू महाराज ज्यू. कॉलेज ऑफ सायन्स घाटबोरीचे प्राचार्य प्रशांत देशमुख, एम.सी.डी.च्या मुख्याध्यापिका योगिता संतोष डोंबळे यांची उपस्थिती हो ती. दरम्यान, संस्थेचे विश्वस्त संतोष डोंबळे यांनी होळी सण हा वाईट रूढी परंपरा, व्यसनाचा त्याग करून व चांगल्या गोष्टी जीवनात स्वीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला शिवाजी रहाटे, जगन्नाथ गायकवाड, नंदकिशोर पाखरे, राधिका महाजन, पूजा तोंडे, वर्षा मोरे, समिना शेख, शीतल बोंडफळे, कल्पना शंकरवार, अमोल राठोड, विठ्ठल मोरे, अनिता आडे, सुनील सरोदे, दिलीप गोरे यांच्यासह बहुसं ख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
नैसर्गिक फुलांचा वापर करावा!पळसाच्या फुलांचा रंग यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहे. तसेच यामुळे कुठलेही नुकसान नसून, त्वचेसाठी आयुर्वेदिक गुणधर्मामुळे फायदेशीर ठरतो. त्यामुळे रंगपंचमीला केमिकलयुक्त रंग न वापरता कोरडे आणि नैसर्गिक रंग वापरावे, जेणेकरून कुठलेही नुकसान होणार नाही व आ पण सुरक्षित राहू, असे योगिता संतोष डोंबळे यांनी सांगितले.