हिवरा आश्रम: शालेय शिक्षण घेत असतांना प्रत्येक विद्यार्थी हा पुस्तकीज्ञानासोबतच प्रत्यक्ष कृतीतून लवकर शिकत असतो. यासाठी त्यालाप्रयोगात्मक शिक्षणाची गरज असते. विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांनात्यांच्या प्रयोगाला एक व्यासपिठ मिळते, असे प्रतिपादन जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ.सरीता पाटील यांनी केले.शुकदास महाराज यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्य गुरुवारी विवेकानंद विद्यामंदीर व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित विज्ञान प्रदर्शनी च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विवेकानंद आश्रम चे अध्यक्ष रतनलालमालपानी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, प्राचार्य निवृत्तीशिंदे, उपप्राचार्य अनाजी सिरसाट, पर्यवेक्षक प्रा.कैलास भिसडे आदीउपस्थित होते. या प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांनी मुक्त गोठा, बंदीस्तशेळीपालन, गांडूळ खत निर्मिती, ठिबक सिंचन, सौर उर्जेवर चालणारे पंप,पेरणी यंत्र, पेरीस्कोप, घरगुती व्ह्ँक्युम क्लिनर, सोलर हिटर यासारखेअनेक उपकरणासह सहभाग नोंदविला होता. विज्ञान प्रदर्शनीचे दोन गट करण्यातआले होते. यामध्ये वर्ग पाच ते आठ व वर्ग नऊ ते बारा अशी विभागणी करण्यातआली. पहील्या गटातून प्रथम क्रंमाक रोहीनी राजू गुंजकर उपकरण बहूपयोगीपेरणीयंत्र, द्वितीय रुषिकेश रमेश पायघन उपकरण बहूउद्देशिय सोलर सेल तरतृतीय क्रमांक हर्षदिप कृष्णा गवई व वैभव गजानन हाडे उपकरण पेरीस्कोपयांनी पटकावले. दुसºया गटातून प्रथम क्रमांक महेश दीपक पागोरे व कार्तिकमोहन देवकर उपकरण व्हँक्युम क्लिनर, द्वितीय क्रमाक संतोष गुलाबराव तुपकरव अजय विजय जाधव उपकरण सोलर हिटर तर तृतीय क्रमांक क्रांती जिवन केंदळे वआकांक्षा गजानन अंभोरे उपकरण हँडमेड हिटर यांनी प्राप्त केला. याप्रदर्शनात उपकरणांची निवड करण्यासाठी तज्ञ चमुंनी काम पाहीले. यामध्येआत्माराम जामकर, कमलेश बुधवानी, प्रा.गजानन तायडे, विजय गोसावी,श्रीकृष्ण दळवी, श्याम रामेकर, प्रा.श्रीकांत दाभाडे यांचा समावेश होता.
आधुनिकीकरण काळात यांत्रीक शेती करणे गरजेचे आहे. मनुष्य बळाची कमतरता ववेळ वाचविण्यासाठी हे पेरणी यंत्र अंत्यत उपयुक्त. सध्याच्या शेतीच्याकाळात कमीत कमी खर्चाचे हे पेरणी यंत्र तयार केल्या जाते. या यंत्राच्यामाध्यमातून पेरणी बरोबरच खते देण्यात येतात. सदर उपकरण रोहीनी राजूगुंजकर हिने सहाय्यक शिक्षक सदानंद शेळके यांच्या मार्गदर्शनात तयार केलेअसून याच उपकरणाने प्रथम क्रमांक पटकाविला.