बबलु देशमुख / जलंब (जि. बुलडाणा) भारतीय रेल्वेच्यावतीने वातावरणातील बदलाची माहिती देण्याकरिता ह्यसायन्स एक्स्प्रेसह्ण अशी खास रेल्वे १५ ऑक्टोबरपासून देशभरात विविध स्थानकांवर फिरविली जात आहे. ही सायन्स एक्स्प्रेस शेगाव तालुक्यातील जलंब या रेल्वे स्थानकावर १६ एप्रिल रोजी आली असून, १८ ए िप्रलपर्यंत ही एक्स्प्रेस विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी पाहण्याकरिता उपलब्ध राहणार आहे. सायन्स एक्स्प्रेस ही १६ डब्यांची असून, हे एकप्रकारे चालते बोलते वैज्ञानिक प्रदर्शन आहे. डि पार्टमेंट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी व भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने ही रेल्वे २00७ पासून सुरू असून, या रेल्वेचे आठवे वर्ष आहे.
जलंब स्थानकावर अवतरली ‘सायन्स एक्स्प्रेस!’
By admin | Published: April 17, 2016 1:10 AM