यासोबतच कडक निर्बंधांच्या काळात कोरोनामुळे ग्रामीण भागात नेमका कितीजणांचा मृत्यू झाला, ही बाब स्पष्ट होऊ शकलेली नाही.
शहरी भागात २४० प्रतिबंधित क्षेत्र
सुमारे सहा लाखांच्या आसपास जिल्ह्यातील नागरी भागाची लोकसंख्या असून या शहरी भागात २४० प्रतिबंधित क्षेत्र असून या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये २ हजार २३२ कोरोनाबाधित रुग्ण सापडलेले आहेत. दरम्यान, शहरी भागातील रुग्णांपैकी ७५७ रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले असून, गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्याही एक हजार ४७५ एवढी आहे.
४० टक्के मृत्यू निर्बंधांच्या काळातच
कोरोनामुळे जिल्ह्यात एकूण ५३६ जणांचा गुरुवारपर्यंत मृत्यू झाला आहे. यांपैकी २१४ जण हे कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या निर्बंध व कठोर निर्बंधांच्या ३४ दिवसांच्या कालावधीत मृत्यू पावलेले आहेत. गेल्या १४ महिन्यांत झालेल्या एकूण कोरोना मृत्यूच्या तुलनेत तब्बल ४० टक्के मृत्यू हे याच कालावधीत झालेले आहेत. सुखद बाब म्हणजे या निर्बंधांच्या काळात ९९.७० टक्के बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.