खामगाव : राज्याच्या अर्थसंकल्पात बुलडाणा येथे कृषी महाविद्यालय उभारण्याची घोषणा राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या घोषणेनुसार सदर कृषी महाविद्यालय स्थापनेसाठी आता जागेचा शोध घेण्याचे काम प्रशासकीय स्तरावर वेगाने सुरू आहे. सदर महाविद्यालयासाठी बुलडाणा व मोताळा अशा दोन तालुक्यांचा प्राधान्याने विचार होत असून, बुलडाणा येथील जागेची उपलब्धता व शैक्षणिक वातावरण लक्षात घेता, येथे सदर महाविद्यालय उभे राहण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सद्यस्थितीत बुलडाणा येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्र व कृषी तंत्र विद्यालय या संस्था कार्यरत आहेत, तर हिवरा आश्रम, जळगाव जामोद व देऊळगाव राजा येथे खाजगी कृषी महाविद्यालये सुरू आहेत. या पृष्ठभूमीवर विद्यार्थ्यांचा ओढा लक्षात घेता, कृषी महाविद्यालयात मोताळा किंवा बुलडाणा या दोन तालुक्यांमध्ये उभारण्याबाबत चाचपणी सुरू आहे. कृषी महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी चारशे हेक्टर लागवडयोग्य जमीन आवश्यक असते. एवढी जमीन बुलडाणा येथे उपलब्ध असल्यामुळे जमीन अधिग्रहणाचा प्रश्न उभा ठरणार नाळा, कृषी संशोधन केंद्राकडे ६८ हेक्टर, कृषी विज्ञान केंद्राकडे २८ व कृषी तंत्र विद्यालयाकडे २३ हेक्टर जमीन असून, जिल्हा कारागृहाच्या बाजूला जमिनीेचा पोत अतिशय उत्तम आहे. त्यामुळे या जमिनीचा वापर कृषी महाविद्यालयाच्या उभारणीसाठी केला जाऊ शकतो.
कृषी महाविद्यालयासाठी जागेचा शोध!
By admin | Published: March 24, 2016 2:49 AM