लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना लॉकडाऊनमध्ये जनुना तलावावर आंघोळीसाठी गेलेल्या १०० पेक्षा अधिक जणांनी शनिवारी अचानक तलावावरून वाट मिळेल तिकडे धूम ठोकली. पोलिस कारवाई टाळण्यासाठी अनेकांनी कपडे तलावाच्या काठावरच टाकून वाट मिळेल तिकडे पळून जाण्यात धन्यता मानली. यावेळी पोलिसांनी २४ वाहने जप्त केली असून, १८ जणांविरोधात कारवाई केली आहे.कोरोना संचारबंदी काळात जनुना तलावावर शहरातील काही प्रतिष्ठित आणि सामान्य नागरिक आंघोळ करीत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शिवाजी नगर आणि शहर पोलिसांनी एकत्रित कारवाई करण्यासाठी जनुना तलाव गाठले. यावेळी तलावात १०० पेक्षा अधिक जण आंघोळीसाठी आल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी कारवाईस सुरूवात केली. तलावावर आंघोळ करण्यासाठी घराबाहेर पडलेल्यांच्या कानावर पोलीस कारवाईची बातमी वाºयासारखी पसरली. त्यावेळी पोलिस कारवाई टाळण्यासाठी अनेकांनी आपले कपडे तलावाच्या काठावरच सोडून पळ काढला. पोलिस कारवाईच्या धास्तीने कोरोना आपत्ती व्यवस्थापन नियमांचा भंग करणाºयांमध्ये एकच खळबळ उडाली. तलावावरून धूम ठोकणाºया काहींना पोलिसांनी पाठलाग करीत ताब्यात घेतले. तर तलावाच्या मुख्य गेटवर उभी असलेली २४ दुचाकी आणि चारचाकी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. १८ जणांवर कारवाईही केली. त्यामुळे तलावावर आंघोळीला जाणे अनेकांच्या अंगलट आले.
करमत नाही म्हणून पोहोचले तलावावर!- पोलिस कारवाई दरम्यान,अनेकांनी घरी करमत नाही म्हणून पोहायला येत असल्याचे पोलिसांना सांगितले. यावेळी काहींना पोलिसांनी चांगलाच प्रसादही दिला. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये अनेक बड्या घरातील व्यक्तींचा समावेश असल्याचे समजते.
अर्ध नग्न अवस्थेत त्याने गाठले घर!- शनिवारी सकाळी जनुना तलावावर आंघोळीसाठी गेलेल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने तलाववरून शहराकडे धूम ठोकली. तलावाच्या काठावर टाकलेले कपडे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे काही वेळ तलाव परिसरात लपून बसलेल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीला चक्क अंडरवेअरवर घरी येण्याची वेळ आली. शहरातील जनुना तलाव ते नॅशनल हायस्कूल परिसरापर्यंत हा इसम अंडरवेअरवरच आल्याने, अनेकांसाठी पोलिस कारवाई चर्चेचा विषय बनली होती.
- कोरोना काळात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, अशाही परिस्थितीत काही जणांचा शहरात तसेच इतरत्र मुक्तसंचार आहे. शनिवारी जनुना तलावावर आंघोळीसाठी गेलेल्यांवर शहर आणि शिवाजी नगर पोलिसांनी एकत्रित कारवाई केली. यावेळी काही जण तलावावर कपडे सोडून पळून गेले. त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.-हेमराजसिंह राजपूतअप्पर पोलिस अधिक्षक, खामगाव.