लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : मेहकर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासूनस रेशनच्या मालाची अफरातफर सुरू असल्याच्या अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे ५ जुलै रोजी अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी व अन्न पुरवठा निरीक्षक यांना गुप्त माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी सोनाटी येथून तांदळाचे १०१ कट्टे जप्त केले आहेत. तसेच सोनाटी परिसरातील स्वस्त धान्य दुकानदार यांची चौकशी करून त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी ए.एफ. सैयद यांनी सांगितले. मेहकर तालुक्यात रेशनच्या तांदूळ व गव्हाची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री सुरू असल्याची चर्चा होती. मधुकरराव गवई यांनीसुद्धा तशी तक्रार केली होती. दरम्यान, सोनाटी येथे रेशनच्या मालाची अफरातफर होत असल्याची गुप्त माहिती अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी ए.एफ. सैयद व निरीक्षक जे.डी. देशमुख, अव्वल कारकून ए.डी. बोरे यांना मिळाल्यावरुन त्यांनी तत्काळ सोनाटी येथे जाऊन पोलीस पाटील गणेश पुरी यांना सोबत घेऊन गावात चौकशी केली असता गुरांच्या सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे असलेल्या एका खोलीत तांदळाचे कट्टे आढळून आले. त्यानंतर पंचनामा करून तांदळाचे १०१ कट्टे जप्त करण्यात आले.सोनाटी परिसरातील दुकानांची होणार चौकशी५ जुलै रोजी सोनाटी येथे एका खोलीत तांदळाचे १०१ कट्टे आढळून आले. अन्न पुरवठा अधिकारी ए.एफ. सैयद व जे.डी.देशमुख यांनी सदर कट्टे जप्त केले आहेत. परंतु सदर कट्टे हे रेशनचे आहेत का? तसेच जर रेशनचे असतील, तर सोनाटी परिसरातील दुकानदारांची चौकशी करुन दोषींवर रीतसर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न पुरवठा अधिकारी सैयद यांनी सांगितले.दोषींवर कारवाई व्हावी - मनसेसोनाटी येथे रेशनच्या मालाची अफरातफर होत असल्याची बाब मनसेचे लक्ष्मण जाधव यांना समजताच त्यांनी कार्यकर्त्यांसह सोनाटी येथे जाऊन पाहणी केली व चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तांदळाचे १०१ कट्टे जप्त!
By admin | Published: July 06, 2017 12:08 AM