शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

स्वस्त धान्याची ३५0 पोती गहू, तांदूळ जप्त

By admin | Published: January 28, 2017 2:33 AM

पंधरा दिवसातील दुसरी घटना.

शेगाव, दि. २७- तालुक्यातील शिरसगाव निळे येथील स्वस्त धान्य दुकानदाराने जानेवारी महिन्यातील गावात वितरणासाठी उचल केलेला माल गावात घेऊन न जाता ते शेगाव शहरातील खरेदी-विक्री संस्थेच्या गोडाउनमध्ये खुल्या मॉर्केटमध्ये विक्रीसाठी ठेवल्याचे मिळून आले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दखल करण्यात आला आहे.गजानन हरिभाऊ निळे या शिरसगाव निळे येथील स्वस्त धान्य दुकानदाराने जानेवारी महिन्याचे स्वस्त धान्य शासनाच्या गोडाउनमधून उचल करून गावात वितरण न करता ते खुल्या मॉर्केटमध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने शेगाव शहरातील खरेदी विक्री संस्थेच्या गोडाउनमध्ये ठेवल्याची माहिती बुधवारी रात्री निवासी नायब तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षण अधिकारी शालिग्राम पवार यांना मिळाल्यावरून त्यांनी आपल्या पथकासह गुप्त खबर्‍याने दाखविलेल्या गोडाउनची माहिती तपासणी केली असता, तेथे २१0 कट्टे गहू वजन १0५ क्विंटल २२ किलो किंमत १ लाख ७२ हजार २५0 रुपये आणि १४0 तांदळाचे कट्टे वजन ७0 क्विंटल किंमत १ लाख २६ हजार ९६0 रुपये असा माल मिळून आला. सदर माल ताब्यात घेऊन याबाबत पुरवठा निरिक्षण अधिकारी शालिग्राम पवार यांनी शेगाव शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून स्वस्त धान्य दुकानदार गजानन हरिभाऊ निळे रा. शिरसगाव निळे यांच्या विरुद्ध कलम ३, ७ अत्यावश्यक वस्तू कायदा अधिनियम १९५५ अन्वये गुन्हा दखल करण्यात आला आहे.