लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा : मेहकर तालुक्यातील गजरखेड शिवारातील गाळपेर्याच्या पट्टयातून रेतीची विना परवना वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाने कारवाई करत ताब्यात घेतल्याची घटना गुरूवारला घडली. यामध्ये ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी वाहन चालकासही ताब्यात घेण्यात आले होते. गजरखेड शिवारातील गट नं.१११ मध्ये प्रकाश बाजीराव दुनगू व संजय जानराव दुनगू यांचे गाळपेर्यातील शेती आहे. यामधून अनेक वेळा रेतीची विना परवाना वाहतूक करण्यात येत होते. दरम्यान, गुरूवारी मेहकरचे तहसिलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी विजय लोखंडे, तलाठी ज्ञानेश्वर खरात, उंकडा बोरकर, लक्ष्मी शेळके यांनी तत्काळ घटनास्थळी जात रेतीची अवैध वाहतूक करणारे ज्ञानेश्वर हरीभाऊ आराख (ट्रॅक्टर क्रमांक एमएच-२८ -टी- ७८३७) आणि मंगेश ठाकरे यांचे ट्रॅक्टर रेतीसह पकडले. प्रकरणी पंचनामा करून तलाठी यांनी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महसूल विभागाच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.
मेहकर तालुक्यात रेतीची विनापरवाना वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:44 AM
हिवरा : मेहकर तालुक्यातील गजरखेड शिवारातील गाळपेर्याच्या पट्टयातून रेतीची विना परवना वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाने कारवाई करत ताब्यात घेतल्याची घटना गुरूवारला घडली. यामध्ये ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी वाहन चालकासही ताब्यात घेण्यात आले होते.
ठळक मुद्दे४२ हजारांचा ठोठावला दंड; महसूलची कारवाई